एक्स्प्लोर

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या - 

मराठमोळ्या आदिती द्रविडने आंतरराष्ट्रीय पातळीवर रोवला भारताचा झेंडा

मनोरंजनसृष्टीत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' आणि 'बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'कडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. नुकतीच या दोन्ही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' आणि 'बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'मध्ये आदिती द्रविडने भारताचे नाव अभिमानाने उंचावले आहे.

सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आर. माधवनचा 'रॉकेट्री' ओटीटीवर होणार रिलीज

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेता आर माधवन सध्या 'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' या सिनेमामुळे चर्चेत आहे. रिलीजआधीच हा सिनेमा चर्चेत आला होता. 75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये या सिनेमाचा प्रीमिअर झाला होता. या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. आता हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. 

अमिताभ बच्चनच्या 'गुडबाय'ची रिलीज डेट जाहीर

अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना सध्या 'गुडबाय' या सिनेमामुळे चर्चेत आहेत. त्यांचा 'गुडबाय' हा सिनेमा 7 ऑक्टोबर 2022 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. 

विनाकारण ट्रोल करू नका; रणवीर भावाला 'व्हिलन'चा सपोर्ट

बॉलिवूडचा बाजीराव अर्थात अभिनेता रणवीर सिंह सध्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर रणवीरचे न्यूड फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. नेटकरी एकीकडे रणवीरचे कौतुक करत आहेत तर दुसरीकडे त्याच्यावर टीकादेखील करत आहेत. मात्र अभिनेता अर्जुन कपूरने रणवीरला पाठिंबा दिला आहे.

‘डंकी’च्या चित्रीकरणासाठी ‘किंग’ शाहरुख खान लंडनमध्ये!

बॉलिवूड किंग अभिनेता शाहरुख खान याने एप्रिलमध्येच त्याच्या आगामी प्रोजेक्ट 'डंकी'ची घोषणा केली होती. अभिनेत्याच्या या घोषणेनंतर त्याचे चाहते आणि प्रेक्षक खुश झाले होते. त्याच्या या आगामी चित्रपटाचे शूटिंग आधीच सुरू झाले असून, शाहरुख खान या चित्रपटाच्या सीक्वन्स शूट करण्यासाठी लंडनला पोहोचला आहे. नुकतेच त्याच्या या शूटच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या चित्रपटातील अभिनेता शाहरुख खान याचा हा लूक पाहून चाहते खुश झाले आहे.

'भाभीजी घर पर है' फेम अभिनेता दीपेश भान यांचे निधन

‘भाभी जी घर पर हैं’या मालिकेत ‘मलखान’ची भूमिका साकारणारे अभिनेते दीपेश भान यांचे निधन झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दीपेश क्रिकेट खेळत होते आणि अचानक बेशुद्ध होऊन पडले. यानंतर तिथे उपस्थित लोकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. सोशल मीडियावर ‘मलखान’च्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. अभिनेता दीपेश भान यांच्या निधनाने अवघ्या टीव्ही विश्वात शोककळा पसरली आहे.

राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राहुल देशपांडेंची प्रतिक्रिया

राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर राहुल देशपांडे म्हणतात, "हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ज्यावेळी माझे नाव या पुरस्कारासाठी जाहीर झाले त्यावेळी माझ्यासह माझ्या घरच्यांच्याही डोळ्यांत पाणी आले. हा पुरस्कार मी माझ्या आजोबांना म्हणजेच, पंडित वसंतराव देशपांडे यांना समर्पित करत आहे. कारण संगीताचा वारसा मला त्यांच्याकडून लाभला. त्यामुळे हा त्यांचाही सन्मान आहे. या पुरस्कारावर नाव माझे असले तरीही मेहनत चित्रपटाच्या संपूर्ण टीमची आहे. इतक्या वर्षांची मेहनत फळाला आली."

'रंजना - अनफोल्ड’ चित्रपटामधून उलगडणार अभिनेत्री रंजना देशमुख यांचा जीवनप्रवास!

मराठी सिनेसृष्टीतील बऱ्याच अभिनेत्रींनी आपल्या संवेदनशील अभिनयानं रसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. आपल्या चौफेर अदाकारीनं ब्लॅक अँड व्हाईटचा जमानाही रंगीन बनवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रंजना देशमुख यांचं नाव आघाडीवर आहे. देखणा चेहरा, अभिनयातील विविधता, सुरेख संवादशैली आणि मनमोहक नृत्याच्या बळावर रंजना यांनी एक काळ गाजवत प्रेक्षकांवर जणू आपल्या सौंदर्याची मोहिनीच केली होती. त्या काळातील आघाडीच्या दिग्दर्शकांच्या चित्रपटात काम करताना अभिनेत्यांसोबत जोड्या जुळवत त्यांनी बरेच सिनेमे गाजवले. अशा चतुरस्र अभिनेत्री असणाऱ्या रंजना यांचा जीवनप्रवास चित्रपट रूपात मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.

सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार जाहीर झाल्याने भारावून गेलो : मनोज मुन्तशिर

राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आपला आनंद व्यक्त करत मनोज म्हणाला, "सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मला जाहीर झाला आहे यावर माझा विश्वास बसत नव्हता. राष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. यंदाचा पुरस्कार मला जाहीर झाल्याचा नक्कीच आनंद आहे. राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर चाहते कौतुक करत आहे. या सर्व गोष्टी पाहून मी भारावलो आहे". 

'रंग माझा वेगळा' टीआरपीच्या शर्यतीत सलग दुसऱ्या आठवड्यात पहिल्या क्रमांकावर

मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टीआरपीच्या शर्यतीत 'रंग माझा वेगळा' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार

व्हिडीओ

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Embed widget