एक्स्प्लोर

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -

अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’च्या रिलीजचा मुहूर्त ठरला!

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री तब्बू आणि श्रिया सरन यांचा ‘दृश्यम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते आणि प्रेक्षकही या चित्रपटाच्या पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत होते. आता नुकतीच या चित्रपटाच्या रिलीजची डेट जाहीर करण्यात आली आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित ‘दृश्यम 2’ हा चित्रपट येत्या 18 नोव्हेंबरला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

थलापती विजयच्या आगामी 'वरिसु' सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता थलापती विजयचा 'वरिसु' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच थलापती विजयने या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. थलापती विजयचा नुकताच 'बीस्ट' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगली कमाई केली नव्हती. पण 'वरिसु' सिनेमा मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असे म्हटले जात आहे. 

गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘डियर मॉली’चा ट्रेलर आऊट

सिनेसृष्टीला अनेक उत्तमोत्तम सिनेमे देणारे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे पुन्हा एकदा एक अनोखा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. गुवाहाटी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट फिचर फिल्म’ने सन्मानित करण्यात आलेला ‘डियर मॅाली’ हा सिनेमा 1 जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. हा सिनेमा मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर झळकला असून हा एक नातेसंबंधावर भाष्य करणारा सिनेमा आहे. 

खिलाडी कुमारच्या 'रक्षा बंधन'चा ट्रेलर आऊट

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'रक्षा बंधन' सिनेमामुळे चर्चेत आला आहे. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. हा सिनेमा बहिण-भावाच्या नात्यावर भाष्य करणारा आहे. 

जितेंद्र कुमारच्या 'जादूगर'चा ट्रेलर रिलीज

पंचायत फेम अभिनेता जितेंद्र कुमारचा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'जादूगर' असे या सिनेमाचे नाव आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 

तापसी आणि अनुरागच्या 'दोबारा'चा लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार प्रीमियर

एकता कपूर आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचा बहुप्रतिक्षित नवीन काळातील थ्रिलर 'दोबारा' 19 ऑगस्ट 2022 ला प्रदर्शित होत आहे. तापसी पन्नूच्या या  चित्रपटाचे लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर होणार आहे. दिग्दर्शक-अभिनेता जोडी 23 जून, संध्याकाळी 6 वाजता #LIFF2022 ओपनिंग नाईट गालामध्ये चित्रपट सादर करणार आहेत.

तब्बल चार वर्षांनंतर डिस्नीच्या लाईट शोमध्ये झळकला जॉनी डेपचा चेहरा!

तब्बल सहा आठवडे चाललेल्या मानहानीच्या खटल्यातून आता अभिनेता जॉनी डेप याची निर्दोष सुटका झाली आहे. पूर्व पत्नी एम्बर हर्ड हिने केलेल्या आरोपांमुळे जॉनी डेप याला अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. या आरोपांमुळे त्याच्या हातातील सर्व कामं काढून घेण्यात आली होती. इतकंच नाही तर, डिस्नीची लोकप्रिय चित्रपट सीरीज ‘पायरट्स ऑफ कॅरेबियन’मधूनही त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. मात्र, आता चार वर्षानंतर पुन्हा एकदा डिस्नीने जॉनी डेपचा चेहरा त्यांच्या लाईट शोमध्ये दाखवल्यामुळे प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

रंगाची उधळण करणाऱ्या 'रेनबो'च्या शूटिंगला लंडनमध्ये सुरुवात

'रेनबो' या सिनेमाची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली असून तेव्हापासूनच हा सिनेमा चर्चेत आहे. आता या सिनेमाच्या शूटिंगला लंडनमध्ये सुरुवात झाली आहे. लवकरच रंगांची उधळण करणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

करीना नाही तर जेहदेखील करतो योगा; बेबोने चाहत्यांना दाखवली झलक

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचे अभिनयासोबत फिटनेसकडेदेखील लक्ष असते. करीनाच्या फिटनेसचे रहस्य मात्र योगा आहे. आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त करीनाने तिच्या लाडक्या लेकाचा जेह अली खानचा एक खास फोटो शेअर केला आहे. 

चुकीच्या पद्धतीनं रूट कॅनल सर्जरी केल्याचा स्वाती सतीशचा आरोप

कन्नड अभिनेत्री स्वाती सतीश सध्या चर्चेत आहे. सध्या स्वातीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत स्वातीच्या चेहऱ्यावर सूज दिसत आहे. स्वातीने 29 मे रोजी रूट कॅनल सर्जरी केली होती. आता स्वातीने चुकीची सर्जरी केल्याचा आरोप डॉक्टरांवर केला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget