TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
अक्षया-हार्दिकने गुपचूप उरकला साखरपुडा
'तुझ्यात जीव रंगला'मालिकेतील राणा दा आणि पाठकबाईंच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे.सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
'वीर दौडले सात'चं मोशन पोस्टर रिलीज
मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. महेश यांचे चित्रपट हे वेगवेगळ्या विषयांवर आधारित असतात. लवकरच त्यांचा वीर दौडले सात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काल (2 एप्रिल) महेश यांनी या चित्रपटाचा मोशन पोस्टर अक्षय्य तृतियेच्या दिवशी रिलीज होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. आता नुकताच या चित्रपटाचा मोशन पोस्टर रिलीज करण्यात आला आहे.
'लंडन मिसळ' चित्रपटाचं पोस्टर रिलीज
अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर जालिंदर गंगाराम कुंभार दिग्दर्शित 'लंडन मिसळ' या चित्रपटाची सोशल मीडियाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली आहे. श्री.रवींद्रनाथ टागोर यांनी लिहीलेल्या एका नाटकावरून प्रेरित होऊन या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर झळकले असून या पोस्टरमध्ये एका मुलीने पुतळ्यामागे लपून त्या पुतळ्याला आपल्या हाताने मिशी लावलेली दिसत आहे. हा नक्की कोणाचा चेहरा आहे आणि याचा नेमका अर्थ काय, हे सध्यातरी गुलदस्त्यात आहे.
'पंचायत'चा नवा सीझन येणार प्रेक्षकांच्या भेटीस
पंचायत या कॉमेडी ड्रामा वेबसीरीजमध्ये जितेंद्र कुमार , रघुवीर यादव आणि नीना गुप्ता यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या सीरिजचं दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केलं आहे. या सीरिजमध्ये अभिषेक मिश्रा या मुलाची गोष्ट दाखवण्यात आली. आता लवकरच या सीरिजचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
'तमाशा लाईव्ह' चा टीझर रिलीज
संजय जाधव दिग्दर्शित 'तमाशा लाईव्ह' या चित्रपटातील 'चित्रपटाची नांदी' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले. या गाण्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर चित्रपटाचा भन्नाट टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
‘भारत माझा देश आहे’मधील ‘हुतूतू हूतूतूतू' गाणं प्रदर्शित
‘भारत माझा देश आहे’ हा चित्रपट येत्या 6 मे रोजी प्रदर्शित होत आहे. आता या सिनेमातील ‘हुतूतू हूतूतूतू’ हे धमाकेदार गाणं प्रदर्शित झालं आहे. समीर सावंत यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला आश्विन श्रीनिवासन यांचे संगीत लाभले आहे.‘हुतूतू हूतूतूतू’मध्ये बालकलाकारांची धम्माल पाहायला मिळत आहे.
ग्लोबल खान्देश महोत्सवात घुमला अहिराणी गाण्याचा आवाज
खान्देशी संस्कृती आणि व्यापार उद्योगाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारे एकमेव व्यासपीठ "ग्लोबल खान्देश महोत्सव". हा महोत्सव यंदा कल्याण येथे पार पडला. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत "मराठी पाऊल पडते पुढे" या चिराग पाटील आणि सिद्धी पाटणेच्या आगामी सिनेमाचे आहिराणी भाषेतील गाणे "हाऊ पोऱ्या अनेर काठणा" हे या कार्यक्रमात लॉंच करण्यात आले.
'फाईल नंबर 498 A' सिनेमाचे पोस्टर लॉंच
'फाईल नंबर 498 A' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर लॉंच करण्यात आले आहे. मराठी चित्रपटांमध्ये आत्तापर्यंत न्यायव्यवस्थेशी संबंधित किंवा कोर्टरूम ड्रामा प्रकारातील काही चित्रपट येऊन गेले. त्यात आता मल्हार गणेश दिग्दर्शित 'फाईल नंबर- 498 A' या आगळ्यावेगळ्या नावाच्या चित्रपटाची भर पडत असून, या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे.
अथिया- राहुल लवकरच अडकणार लग्नबंधनात
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नानंतर आता अथिया शेट्टी आणि के एल राहुल लग्नबंधनात अडकणार आहे. अथिया आणि क्रिकेटर के एल राहुल डिसेंबर 2022 मध्ये सात फेरे घेणार आहेत.
राज ठाकरेंसंबंधित प्राजक्ता माळीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्राजक्ता चंद्रमुखी सिनेमामुळे चर्चेत आली नाही तर राज ठाकरेंसंबंधित केलेल्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. आज 3 तारीख असे म्हणत प्राजक्ताने भोंग्यांच्या अल्टिमेटमची आठवण करुन दिली आहे.