एक्स्प्लोर
किरण रावच्या घरातील 53 लाखांच्या दागिने चोरीचे पुरावे नाही!
2016 मध्ये किरण राव यांच्या खारमधील निवासस्थानी जवळपास 53 लाख रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी झाली होती.
मुंबई : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमीर खानची पत्नी आणि निर्माती किरण रावच्या घरी झालेल्या 53 लाखांच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणी पोलिसांना कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. मुंबई पोलिस कोर्टात अहवाल सादर करणार आहेत. 'मिड-डे' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
2016 मध्ये किरण राव यांच्या खारमधील निवासस्थानी जवळपास 53 लाख रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी झाली होती. यामध्ये हिऱ्याचा हार आणि अंगठीचा समावेश आहे. तेव्हापासून या चोरीचा तपास सुरु आहे.
पोलिसांनी कलम 453 अन्वये गुन्हा दाखल केला होता. आमीर खानच्या घरातील आजी-माजी कर्मचारी, ड्रायव्हर यांटी पोलिसांनी चौकशी केली होती. मात्र खान दाम्पत्याने घरातील कर्मचाऱ्यांची चौकशी न करण्याची विनंती केल्याची माहिती आहे.
आरोपीचा माग काढता येण्यासाठी कोणतेही पुरावे सापडले नसल्याचं तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे तूर्तास मुंबई पोलिस कोर्टात सारांश अहवाल सादर करणार आहेत. पुढील काही दिवसात पुरावे आढळल्यास तपासासाठी केस रिओपन करण्यात येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
बातम्या
क्रीडा
Advertisement