एक्स्प्लोर

भारतीय सिनेमाला जमलं नाही ते 'अॅव्हेंजर्स: एण्डगेम'ने केलं, 24 तास थिएटर सुरु राहणार

हा चित्रपट 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. 'अॅव्हेंजर्सः एण्डगेम'मध्ये रॉबर्ट डाऊनी ज्युनियर, क्रिस इवान्स, मार्क रुफेलो, क्रिस हेम्सवर्थ, स्कारलेट योहान्सन आणि ब्री लारसन यांची प्रमुख भूमिका आहे. '

मुंबई : जे कोणत्याच भारतीय सिनेमाला जमलं नाही ते 'अॅव्हेंजर्स: एण्डगेम'ने करुन दाखवलं आहे. या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला असा छप्परतोड प्रतिसाद मिळतोय की या सिनेमाचे शोज 24 तास सुरु ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. आतापर्यंत उशिरात उशिरा म्हणजे रात्री 11.30 ला शो व्हायचा आणि परवानगी तेवढ्यापुरतीच मर्यादित होती. पण 'एण्डगेम'ला काही लिमिटच नाही. रात्री 12, 1, 2, 3 अहो पहाटे चारच्या शोला सुद्धा बुकिंग सुरु झालं आहे. हा पराक्रम भारतीय सिनेमाला करता आला नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. जगात सर्वात जास्त सिनेमाची निर्मिती करणारा आपला देश. तरीही इथे छप्परतोड धंदा करतो तोसातासमुद्रापल्याड बनलेला सिनेमा. अर्थात तो सिनेमा त्या ताकदीचाही असतो. प्रश्न एवढाच की ती ताकद आपल्या सिनेमात कधी दिसणार? दहा लाख तिकीटांचं अॅडव्हान्स बुकिंग तिकीट विक्रीच्या बाबतीत 'अॅव्हेंजर्स: एण्डगेम' नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. बुकमायशोच्या माहितीनुसार, एकाच दिवशी 'अॅव्हेंजर्स: एण्डगेम'च्या 10 लाखांपेक्षा जास्त तिकीटांची विक्री झाली आहे. प्रति सेंकद 18 तिकीटं या वेगात विक्री झाली आहे. हा चित्रपट 26 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. 'अॅव्हेंजर्सः एण्डगेम'मध्ये रॉबर्ट डाऊनी ज्युनियर, क्रिस इवान्स, मार्क रुफेलो, क्रिस हेम्सवर्थ, स्कारलेट योहान्सन आणि ब्री लारसन यांची प्रमुख भूमिका आहे. 'अॅव्हेंजर्स: एण्डगेम' हा मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा 22वा चित्रपट आहे. याआधी 'कॅप्टन मार्वल' प्रदर्शित झाला होता. सर्वात महागड्या तिकीटाची विक्री अॅव्हेंजर्सचे चाहतेही या सिनेमाच्या तिकीटावर पैसे खर्च करत आहेत. आतापर्यंत या सिनेमाच्या सर्वात महागड्या तिकीटाची विक्री झाली आहे. तब्बल 2400 रुपयांना तिकीट विकलं गेलं आहे. दिल्लीतील एका थिएटरमध्ये या सिनेमाचं तिकीट सर्वात महागडं होतं. मुंबईत सर्वात महागडं तिकीट आयनॉक्सने विकलं होतं. या तिकीटाची किंमत होती 1765 रुपये. आतापर्यंत आमीर खानच्या  'ठग्स ऑफ हिंदोस्तान'च्या तिकीटासाठी एवढात दर निश्चित करण्यात आला होता. पण ते देखील 1500 रुपयांना विकलं गेलं.

महत्त्वाच्या बातम्या

Anurag Kashyap on Diljit Dosanjh: 'सतलज' चित्रपट हटवल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपचं प्रेक्षकांना आवाहन; चित्रपट नक्की बघा, पायरेटेड असला तरी...
'सतलज' चित्रपट हटवल्यानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपचं प्रेक्षकांना आवाहन; चित्रपट नक्की बघा, पायरेटेड असला तरी...
Junior Artist Sanjeeb Singh: TV मालिकेचं शुटिंग संपवून घरी जात होता, पेट्रोल भरायला थांबला अन्.. प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
TV मालिकेचं शुटिंग संपवून घरी जात होता, पेट्रोल भरायला थांबला अन्.. प्रसिद्ध अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Raj Thackeray on RJ Malishka: 'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय? म्हणणारी ती बाई आता कुठे गेली?'; RJ मलिष्कावरुन राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय? म्हणणारी ती बाई आता कुठे गेली?'; RJ मलिष्कावरुन राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
Arbaj Shaikh Solapur Hospital Allegations: 'आमची कोणतीही चूक नाही'; अरबाज शेखच्या गंभीर आरोपांवर नोबल हॉस्पिटलची पहिली प्रतिक्रिया
'आमची कोणतीही चूक नाही'; अरबाज शेखच्या गंभीर आरोपांवर नोबल हॉस्पिटलची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Shashikant Shinde : शरद पवार आणि एकनाथ शिंदेंची भेट राजकीय नव्हती, शशिकांत शिंदेंचे स्पष्टीकरण; एनडीएत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, शशिकांत शिंदेंचं मविआच्या नेत्यांना आवाहन
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत संतापले, गद्दार म्हणाले; आता, एकनाथ शिंदेंचा पलटवार, राष्ट्रवादीचेही उत्तर
Ali Khamenei Home Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
Video: ना राजेशाही थाट, ना टोलेजंग वाडा! इराणने अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीपूर्वी उद्ध्वस्त निवासस्थानाचा व्हिडिओ दाखवला, अमेरिका- इस्रायलने तिथंच तब्बल 35 क्षेपणास्त्रे डागली
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
रक्षकच बनले भक्षक, महिलेवर अत्याचार; पोलीस भरतीत अधिक गुण देण्याचे आमिष, PSI सह कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल
Omraje Nimbalkar: धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाला 'उजवं' वळण, संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी पण राणा जगजितसिंहांना विरोधच
धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या राजकारणाला 'उजवं' वळण, संघाच्या नेत्यांच्या भेटीगाठी पण राणा जगजितसिंहांना विरोधच
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल
राम मंदिराच्या चोरीबद्दल बोललो तर तो धर्माचा अपमान कसा? चोरीचा आणि धर्माचा काय संबंध?? केंद्राने नेमलेल्या 15 पैकी 12 ट्रस्टी RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजपशी संबंधित, बाकी कोणीच नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल
मोठी बातमी! समान नागरी कायदा लवकरच विधिमंडळात; 7 जणांची समिती गठीत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
मोठी बातमी! समान नागरी कायदा लवकरच विधिमंडळात; 7 जणांची समिती गठीत, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Embed widget