Samaira : अनन्यसाधारण 'समयरा'च्या प्रवासाची झलक; ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
Samaira : 'समायरा' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Samaira : 'समायरा म्हणजे प्रोटेक्टेड बाय गॉड' नावाप्रमाणेच समायराचा प्रवास आहे. प्रश्नांच्या विळख्यात सापडलेली समायरा कशी अध्यात्माच्या उंबऱ्यावर येऊन थांबते. स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात निघालेली 'समायरा' आणि तिचा अनन्यसाधारण प्रवास खूप काही शिकवून जाणार यात काही शंकाच नाही. नुकताच 'समायरा'चा (Samaira) ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
आई-वडिलांच्या शोधात निघालेली 'समायरा' कशी स्वतःच स्वतःला उलगडतेय आणि तिच्या आयुष्याचे काही काळाच्या आड दडून राहिलेले रहस्य कसे हळूहळू समोर येतात हे या ट्रेलरमधून कळत आहे. आजच्या नव्या पिढीला अध्यात्माचे महत्व हा सिनेमा घडवून देईल, असे ट्रेलर पाहून वाटत आहे. 'समायरा'चे आणि तिच्या साथीदाराचे हळुवार उलगडत जाणार नाते नक्कीच प्रेक्षकांना आवडेल.
दिग्दर्शक ऋषी श्रीकृष्ण देशपांडे म्हणतात, 'समायरा' हा सिनेमा म्हणजे आध्यात्माचा साज चढवून आधुनिकतेच्या रंगात रेखलेला इंद्रधनुष्याचा देखावा आहे हे म्हणणं काही वावगं ठरणार नाही. केतकी नारायण आणि अंकुर राठी यांच्या जोडीला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद आणि विशेष म्हणजे तरुण पिढीचा येणार उत्स्फूर्त प्रतिसाद खरंच खूप उत्तम मिळत आहे".
26 ऑगस्टला 'समायरा' येणार प्रेक्षकांच्या भेटीला
ऋषी श्रीकृष्ण देशपांडे दिग्दर्शित 'समायरा' सिनेमा येत्या 26 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ग्लोबल सेवा एलएलपी प्रस्तुत, अद्योत फिल्म्सच्या सहयोगाने, 'समायरा'ची निर्मिती डॉ. जगन्नाथ सुरपूरे, रतन सुरपूरे, शशिकांत पानट, योगेश आळंदकर आणि ऋषी श्रीकृष्ण देशपांडे यांनी केली असून या सिनेमाची पटकथा आणि संवाद सुमित विलास तांबे यांचे आहेत. यात 'समायरा'ची भूमिका केतकी नारायण साकारत असून अंकुर राठी तसच सतीश पूळेकर आणि रोहित कोकाटे निर्णायक भूमिकेत आहेत.
ग्लोबल सेवा एलएलपी प्रस्तुत, अद्योत फिल्म्सच्या सहयोगाने, या सिनेमाची निर्मिती डॉ. जगन्नाथ सुरपूरे, रतन सुरपूरे, शशिकांत पनत, योगेश आळंदकर आणि ऋषी श्रीकृष्ण देशपांडे यांनी केली आहे. 'समायरा' या सिनेमाची पटकथा आणि संवाद सुमित विलास तांबे यांचे आहेत. समायरा या सिनेमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
संबंधित बातम्या