शुटिंगचे सेट म्हणजे महाभयंकर भवताल : सैफ अली खान
भारतात अनेक ठिकाणी चित्रपटांच्या चित्रिकरणांना सुरुवात झाली आहे. अशावेळी अभिनेता सैफ अली खानने नोंदवलेल्या निरिक्षणामुळे मात्र जरा धास्तीच निर्माण झाली आहे.
![शुटिंगचे सेट म्हणजे महाभयंकर भवताल : सैफ अली खान The set of the movie shooting is terrifying says saif ali khan शुटिंगचे सेट म्हणजे महाभयंकर भवताल : सैफ अली खान](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/15195623/Saif-Ali-Khan-GettyImages-4657506441.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कोरोनानंतर आता अनलॉक प्रक्रिया जवळपास पूर्णत्वाला येऊ लागली आहे. अनेक ठिकाणी चित्रपटगृहे सुरु झाली आहेत. कोरोना काळातच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन नियम अटींसह चित्रिकरणं सुरू केली. आता कोरोनानंतर मुख्य चित्रिकरणांना सुरुवात झाली आहे. भारतात अनेक ठिकाणी चित्रपटांच्या चित्रिकरणांना सुरुवात झाली आहे. अशावेळी अभिनेता सैफ अली खानने नोंदवलेल्या निरिक्षणामुळे मात्र जरा धास्तीच निर्माण झाली आहे.
सैफ अली खान सध्या भूत पोलीस चित्रपटाचं चित्रिकरण धरमशाला इथे करत होता. म्हणजे नुकतंच त्याने हे शूट पूर्ण केलं. आता तो मुंबईत दाखलही झाला आहे. त्यानंतर मात्र त्याने नोंदवलेलं निरीक्षण पाहता जरा काळजी करण्यासारखीच स्थिती सर्वत्र असल्याचं लक्षात येतं. सैफ अली बोलताना म्हणाला, मी चित्रिकरण पूर्ण केलं हे खरं आहे. पण चित्रिकरणाच्या ठिकाणची स्थिती खरंतर महाभयंकर आहे. एरवी त्याचं काहीच वाटलं नसतं पण आता कोव्हिडनंतर अशा ठिकाणी चित्रिकरण करणं म्हणजे तुमच्यावर कमालीचा दबाव असतो. कारण शुटिंग लोकेशन्सवरची सगळीच माणसं तुम्हाला माहीत नसतात. अशावेळी समोरचा नेमका कोण आहे हेच कळत नाही.
चित्रिकरण स्थळाची माहीती देताना सैफ म्हणतो, तिथे सगळेच लोक काळजी घेत असतात. सर्वतोपरी काळजी घेऊन चित्रिकरण करणं चालू असतं. पण तरीही कोरोना काळात असं चित्रिकरण म्हणजे अत्यंत धोकादायक आहे. तिथे गेल्यानंतर मला असं वाटून गेलं की चित्रिकरण हा फारच रिस्की जॉब आहे. हॉस्पिटल्सप्रमाणेच आम्ही सगळे काम करतोय. सैफ अलीच्या या तुलनेनं जरा गहजब उडू शकतो. कारण, हॉस्पिटल्समध्ये चालणारं काम आणि चित्रिकरणासाठी चालणारं काम यात जमीन आस्मानाचा फरक असतो. पण सैफ सांगत असलेली स्थिती लक्षात घेतली, तर कोरोनाची परिस्थिती पाहता अजून काही काळ चित्रिकरणावर बंदी घालावी का असा विचार आता करायला हवा असं कदाचित सैफ सुचवत असेल. किंवा चित्रिकरण करणं आता किती अवघड होऊन बसलं आहे हेच तो सांगत असेल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)