Aapdi Thaapdi : सहकुटुंब आनंद घेता येणारा 'आपडी-थापडी'; पोस्टर आऊट
Aapdi Thaapdi : 'आपडी-थापडी' या सिनेमाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
Aapdi Thaapdi : श्रेयस तळपदेने (Shreyas Talpade) मराठी मनोरंजनक्षेत्रासह बॉलिवूडमध्येदेखील आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) लवकरच 'आपडी थापडी' (Aapdi Thaapdi) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
'आपडी थापडी' हा सिनेमा 5 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. नुकतच या सिनेमाचं पोस्टर लॉंच करण्यात आलं असून सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होत आहे. 'आपडी थापडी' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा आनंद करीर यांनी केली असून के सायलेंटच्या केसी पांडे यांनी निर्मिती केली आहे.
View this post on Instagram
श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वेसह 'आपडी थापडी' या सिनेमात नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे अशा दमदार स्टारकास्ट या सिनेमात आहे. 'फॅमिलीचा सिनेमा बघा फॅमिली बरोबर' अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे. सिनेमाचं पोस्टर आऊट झाल्याने प्रेक्षक आता सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
श्रेयस तळपदेनं मराठी मालिका आणि सिनेमांच्या माध्यमातून कारकिर्द सुरू केली आहे. त्यानंतर त्यानं हिंदी सिनेमांत आपलं स्थान निर्माण केलं. 'बाजी' आणि 'पोस्टर बॉईज' या सिनेमांनंतर जवळपास सात वर्षांनी श्रेयस तळपदे पुन्हा एकदा रुपेरी पड्यावर झळकणार आहे. त्याच्याबरोबर मुक्ता बर्वेसारखी सशक्त अभिनेत्री असल्यानं आपडी-थापडी नक्कीच प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना दसऱ्याची प्रतीक्षा आहे.
संबंधित बातम्या