Bastar: 'द केरळ स्टोरी' नंतर आता विपुल शाह आणि सुदीप्तो सेन यांचा 'बस्तर' येणार प्रेक्षकांच्या भेटीस; चित्रपटाच्या पोस्टरनं वेधलं लक्ष
सुदीप्तो सेन आणि विपुल शाह यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचं नाव 'बस्तर' (Bastar) असं आहे.
Vipul Amritlal Shah and Sudipto Sen Next Project: दिग्दर्शक सुदीप्तो सेन (Sudipto Sen) आणि निर्माते विपुल शाह (Vipul Shah) यांच्या द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटाच्या कथानकाचं आणि चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. आता द केरळ स्टोरीच्या यशानंतर सुदीप्तो सेन आणि विपुल शाह यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचं नाव 'बस्तर' (Bastar) असं आहे.
दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि निर्माते विपुल शाह या जोडीनं त्यांच्या बस्तर या आगामी चित्रपटाची घोषणा नुकतीच केली आहे. सनशाइन पिक्चर्सच्या ट्विटर अकाऊंटवर बस्तर या चित्रपटाचं पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. 'आमच्या बस्तर या चित्रपटाची घोषणा करत आहोत.आणखी एका सत्य घटनेचे साक्षीदार होण्याची तयारी करा जी तुम्हाला अवाक् करेल.' असं कॅप्शन सनशाइन पिक्चर्सनं ट्विटरवर शेअर केलेल्या बस्तर या चित्रपटाच्या पोस्टरला दिलं आहे.
बस्तर या चित्रपटाच्या पोस्टरवर लिहिलं आहे की, हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असणार आहे. सुदीप्तो सेन आणि विपुल शाह यांचा हा चित्रपट 5 एप्रिल 2024 रोजी रिलीज होणार आहे. द केरळ स्टोरी या चित्रपटानंतर आता सुदीप्तो सेन आणि विपुल शाह यांच्या बस्तर या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Unveiling our next, #Bastar. Prepare to witness another gripping true incident that will leave you speechless. Mark your calendars for April 5, 2024!#VipulAmrutlalShah @sudiptoSENtlm @Aashin_A_Shah#SunshinePictures pic.twitter.com/3qQVxKpCcG
— Sunshine Pictures (@sunshinepicture) June 26, 2023
द केरळ स्टोरीला मिळाली प्रेक्षकांची पसंती
दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि निर्माते विपुल शाह यांच्या द केरळ स्टोरी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धी इडनानी या अभिनेत्रींनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटातील अदाच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत. अदानं या चित्रपटात शालिनी ही भूमिका साकरली. काही नेटकऱ्यांनी या चित्रपटाला 'प्रपोगंडा फिल्म' असं म्हणत ट्रोल केलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या: