तू आजकाल ट्वीट करत नाहीस? शिल्पा शेट्टीच्या या प्रश्नावर कपिल शर्मा म्हणाला...
कपिल शर्मा शोमध्ये (The Kapil Sharma Show) शिल्पा शेट्टी, बादशाह आणि मनोज मुंतशीर यांनी हजेरी लावली आहे.
मुंबई: कॉमेडियन कपिल शर्माचे देशभरात अनेक चाहते आहेत. कपिल त्याच्या शोमधे भल्या भल्यांची तोंडं बंद करतो आणि आपल्या गमतीशीर उत्तराने सर्वत्र हशा पिकवतो. "द कपिल शर्मा शो" मध्ये मोठे स्टार्सही त्याचे विनोद ऐकूण गप्प बसतात कारण कपिल शर्माकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असते. पण या आठवड्यात शोमध्ये येणारी पाहुणी बहुदा कपिलचीच बोलती बंद करतील असं प्रोमोमध्ये दिसत आहे. ती खास पाहुणी म्हणजे शिल्पा शेट्टी.
सोनी टिव्हीच्या इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये कपिल, शिल्पा शेट्टी, बादशाह आणि मनोज मुंतशीर दिसत आहेत. हे तिघे 'इंडियाज गॉट टॅलेंट' या शोचे जज 'असून ते या आठवड्यातील शोमध्ये दिसणार आहेत. शिल्पा स्टेजवर येताच कपिल तिच्या पाया पडताना दिसून येतोय. हे पाहून शिल्पा त्याला बाजूला सारते. त्याच वेळी शिल्पा शेट्टी कपिल शर्माची मजा सुद्धा घेते.
या प्रोमोमध्ये शिल्पा असं म्हणताना दिसतेय की, "कपिल शर्मा मध्ये आश्चर्यकारक प्रतिभा आहे. कॉमेडी सोबतच तो मनाला भिडणारे ट्वीट करतो. पण आजकाल कपिल ट्विटरवर दिसत नाही." हे ऐकून कपिलला शॉक बसतो आणि मग तो दबक्या आवाजात म्हणतो की, हो आजकाल मी ट्वीट करत नाही. त्याचवेळी शिल्पाची अशी स्टाईल पाहून कपिल शर्मा म्हणतो. 'तुम्ही काय आज विचार करून आलात की माझी खिल्ली उडवायची आहे...'
कपिल आणि शिल्पा या शोमधे पूर्णवेळ एकमेकांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. शेवटी कपिल तो कपिल. शिल्पानंतर तो शोमध्ये आलेला रॅपर बादशाहचीही खिल्ली उडवताना दिसतो. कपिल म्हणतो की, बादशाह कधीच फ्री नसतो. यावर मनोज मुंतशीर त्याला अडवतो आणि म्हणतो की बादशाह फ्री राहत नाही आणि कुठेही फ्री बसतही नाही. "इंडियाज गॉट टॅलेंट" मध्ये जज म्हणून त्याने खूप सारे मानधन घेतलं आहे. दुसरीकडे, शिल्पा सांगते की बादशाह 'IGT' च्या सेटवर लोकांची आर्थिक मदत करतो, कोणाला बहीण बनवतो.
'द कपिल शर्मा शो'चा हा विशेष भाग येणाऱ्या शनिवार आणि रविवारी प्रसारित केला जाईल, याचा मजेदार प्रोमो सोनी टिव्हीच्या इंस्टाग्रामवर शेयर केला आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha