Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण'चे आठवे पर्व होणार सुरू; लवकरच होणार घोषणा
Karan Johar : करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या लोकप्रिय कार्यक्रमाचे आठवे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Koffee With Karan 8 : सिने-निर्माता करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) या कार्यक्रमाचे सातवे पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'कॉफी विथ करण 7' सुरू असतानाच या पर्वाच्या आठव्या पर्वाची (Koffee With Karan 8) घोषणा झाली आहे.
'कॉफी विथ करण' या बहुचर्चित कार्यक्रमाचे आठवे पर्वदेखील प्रेक्षकांना डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney + Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. 'कॉफी विथ करण'चे सहा पर्व 2004 ते 2019 दरम्यान स्टार वर्ल्ड या चॅनलवर प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. पण आता हा कार्यक्रम ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.
'कॉफी विथ करण'च्या आठव्या सीझनसह आणखी दोन कार्यक्रम प्रेक्षकांना डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहेत. 'शोटाइम' आणि 'महाभारत' या दोन कार्यक्रमांचा यात समावेश आहे. लवकरच 'कॉफी विथ करण', 'शोटाइम' आणि 'महाभारत' या तीन कार्यक्रमांची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
View this post on Instagram
'कॉफी विथ करण'च्या आठव्या पर्वाची घोषणा झाल्याने प्रेक्षक या सिनेमाची कार्यक्रमाची आता आतुरतेने वाट पाहत आहे. या कार्यक्रमाचा सातवा सीझन सध्या चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. एका पेक्षा एक सेलिब्रिटी या कार्यक्रमात सहभागी होत अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळत आहे.
संबंधित बातम्या
Koffee With Karan 7 : 'कॉफी विथ करण'च्या मंचावर येणार विजय देवरकोंडा अन् अनन्या पांडे; प्रेक्षकांना ऐकायला मिळणार मजेशीर उत्तरे
Koffee With Karan 7 : 'मॉम टू बी' सोनम आणि अर्जुन कपूर लावणार कॉफी विथ करणमध्ये हजेरी; भाऊ-बहिणीची जोडी पाहायला प्रेक्षक उत्सुक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
