The Diary of West Bengal: ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ चित्रपट अडकला वादाच्या भोवऱ्यात; पश्चिम बंगाल पोलिसांनी दिग्दर्शकाला पाठवली कायदेशीर नोटीस
‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ (The Diary of West Bengal) या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला पश्चिम बंगाल पोलिसांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
The Diary of West Bengal: ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ (The Diary of West Bengal) या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकाला पश्चिम बंगाल पोलिसांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. हा चित्रपट पश्चिम बंगालच्या रोहिंग्या संघटनेवर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे.
एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक बंगालची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत पश्चिम बंगाल पोलिसांनी ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ या हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला नोटीस बजावली आहे.'
'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल'या चित्रपटाचे निर्माते जितेंद्र नारायण सिंह आहेत आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्रा आहेत.
आता दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना 30 मे रोजी दुपारी 12 वाजता या प्रकरणाचे तपास अधिकारी सुभब्रत कार यांच्यासमोर चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहावे लागणार आहे. 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' या चित्रपटाबाबत पश्चिम बंगाल पोलिसांनी आयपीसीच्या कलम 120(B), 153A, 501, 504, 505, 295 A, आयटी अॅक्ट कलम 66 D, 84B आणि सिनेमॅटोग्राफी कायद्याच्या कलम 7 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.
Maharashtra | West Bengal Police issues notice to the director of the Hindi film "The Diary of West Bengal", alleging that the director is trying to defame Bengal with this film.
— ANI (@ANI) May 26, 2023
Presented by Wasim Rizvi Films, The Diary of West Bengal is produced by Jitendra Narayan Singh and…
कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर, सनोज कुमार मिश्रा यांचे वकील नागेश मिश्रा म्हणाले की, एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि आम्ही कायदेशीर लढाई लढू. ऑगस्ट 2023 मध्ये 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे.
काही दिवसांपूर्वी लखनऊमध्ये 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी निर्माता जितेंद्र नारायण सिंह म्हणाले होते की, गेल्या काही वर्षांत पश्चिम बंगालमधील परिस्थिती अत्यंत धोकादायक बनत चालली आहे. जितेंद्र त्यागी उर्फ वसीम रिझवी यांनी देखील त्यावेळी पश्चिम बंगालमधील सरकारबाबत वक्तव्य केलं होतं.
महत्वाच्या इतर बातम्या: