एक्स्प्लोर

'पश्चिम बंगाल सरकार हे सत्य...'; पश्चिम बंगाल पोलिसांनी कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' च्या दिग्दर्शकाची प्रतिक्रिया

'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' (The Diary of West Bengal) या चित्रपटाचे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी पश्चिम बंगाल पोलिसांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

The Diary of West Bengal:  ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ (The Diary of West Bengal) हा चित्रपट रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.  चित्रपटाच्या दिग्दर्शकाला पश्चिम बंगाल पोलिसांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे.  यासंपूर्ण प्रकरणावर आता लेखक-दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लेखक-दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी  'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' या चित्रपटाद्वारे पश्चिम बंगाल राज्याची बदनामी केल्याचा आरोप करत  सनोज यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच सनोज यांना पोलिसांनी नोटिस देखील पाठवली आहे, याबाबत सनोज मिश्रा यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. 

सनोज मिश्रा यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, त्यांना मिळालेल्या एफआयआरवरून हे दिसून येते की, पश्चिम बंगाल सरकार हे सत्य बाहेर येण्यापासून कसे घाबरले आहे? आणि ते सत्य दडपण्याचा प्रयत्न करत आहेत.

सनोज मिश्रा यांनी असेही सांगितले आहे की, 'मला याची भिती वाटत आहे की,  मला अटक करुन नंतर मला मारुन टाकतील.' सनोज मिश्रा यांनी सांगितले की, ते 30 मे रोजी कोलकाता येथे जाणार असून ते तपासात पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार आहेत.  

दीड वर्षांच्या संशोधनानंतर हा चित्रपट बनवला असून, केवळ पश्चिम बंगाल सरकारच नाही, तर पश्चिम बंगालमधील मुस्लिमांना खूश करण्यासाठी आजतागायत जे तुष्टीकरण होत आहे, ते या चित्रपटात मांडण्यात आल्याचं  सनोज यांनी सांगितले.

पुढे सनोज म्हणाले की, 'मी एक इंडिपेंडेंट  चित्रपट निर्माता आहे, कोणत्याही विषयावर चित्रपट बनवणे हा माझा मूलभूत अधिकार आहे आणि उद्या मी गोधरा (गुजरात) दंगलीवर चित्रपट बनवू शकतो.'

काही दिवसांपूर्वी लखनऊमध्ये 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी निर्माता जितेंद्र नारायण सिंह म्हणाले होते की, गेल्या काही वर्षांत पश्चिम बंगालमधील परिस्थिती अत्यंत धोका दायक बनत चालली आहे.  जितेंद्र त्यागी उर्फ ​​वसीम रिझवी यांनी देखील त्यावेळी पश्चिम बंगालमधील सरकारबाबत वक्तव्य केलं होतं. 

दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना 30 मे रोजी दुपारी 12 वाजता या प्रकरणाचे तपास अधिकारी सुभब्रत कार यांच्यासमोर चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहावे लागणार आहे. 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' या चित्रपटाबाबत पश्चिम बंगाल पोलिसांनी आयपीसीच्या कलम  120(B), 153A, 501, 504, 505, 295 A, आयटी अॅक्ट कलम   66 D, 84B  आणि सिनेमॅटोग्राफी कायद्याच्या कलम 7 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.ऑगस्ट 2023 मध्ये  'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे. 

महत्वाच्या इतर बातम्या: 

The Diary of West Bengal: ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ चित्रपट अडकला वादाच्या भोवऱ्यात; पश्चिम बंगाल पोलिसांनी दिग्दर्शकाला पाठवली कायदेशीर नोटीस

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
Embed widget