The Greatest of All Time: साऊथ स्टार थलापती विजयच्या 68 व्या चित्रपटाचा फर्स्ट लूक आऊट; 'द ग्रेटेस्ट ऑफ द ऑल टाइम'मध्ये साकारणार डबल रोल
The Greatest of All Time: थलपथी विजयच्या (Thalapathy Vijay) या चित्रपटाचं नाव 'द ग्रेटेस्ट ऑफ द ऑल टाइम' (The Greatest of All Time) असं आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये विजय हा डबल रोलमध्ये दिसत आहे.
The Greatest of All Time: अभिनेता थलपथी विजयच्या (Thalapathy Vijay) गेल्या वर्षी रिलीज झालेल्या लियो (Leo) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता थलपथी विजयचा आणखी एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या 68 व्या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचं नाव 'द ग्रेटेस्ट ऑफ द ऑल टाइम' (The Greatest of All Time) असं आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये विजय हा डबल रोलमध्ये दिसत आहे.
थलपथी विजयच्या 68 व्या चित्रपटाची पहिली झलक रिलीज केली आहे. थलपथी विजयच्या या नव्या चित्रपटात तो डबल रोल साकारणार आहे. निर्मात्यांनी 31 डिसेंबर रोजी या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला. फर्स्ट लूकसोबतच निर्मात्यांनी चित्रपटाच्या नावाचीही घोषणा केली आहे. त्याचे नाव द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम आहे. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये दोन थलपथी विजय दिसत आहेत. एका लूकमध्ये थलपथी विजय वयस्कर दिसत आहे तर दुसऱ्या लूकमध्ये तो तरुण दिसत आहे.
"प्रकाश अंधाराला गिळंकृत करू शकतो पण अंधार प्रकाशाला गिळंकृत शकत नाही" अशी टॅगलाइन देखील थलपथी विजयच्या 'द ग्रेटेस्ट ऑफ द ऑल टाइम' या चित्रपटाच्या पोस्टरवर लिहिली आहे.
— Vijay (@actorvijay) December 31, 2023
'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' ची स्टार कास्ट
'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' या चित्रपटाचे दिग्दर्शन व्यंकट प्रभू यांनी केले आहे. व्यंकट प्रभू आणि थलपथी विजय यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. थलपथी विजयच्या व्यतिरिक्त यात मीनाक्षी चौधरी, योगी बाबू, जयराम, लैला, प्रभुदेवा, माइक मोहन आणि प्रशांत हे कालाकर देखील दिसणार आहेत.
रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट टाइम ट्रॅव्हलवर आधारित असणार आहे, असं म्हटलं जात आहे. यात थलपथी विजय 19 वर्षांच्या मुलाची एक भूमिका साकारणार असून दुसरी भूमिका वृद्ध व्यक्तीची असेल, असं म्हटलं जात आहे.
'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' या चित्रपटाचे शूटिंगला ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरुवात झाली आणि राजू सुंदरम यांना या चित्रपटातील एका गाण्याचे कोरिओग्राफ करण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या: