(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'ठाकरे' सिनेमाची थिएटर कॉपी लीक
मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी चंदुलाल भाईचंद शेठ या आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून पोलिसांनी ठाकरे सिनेमाच्या 49 सीडी जप्त केल्या आहेत. सीडीवर 149 रुपये अशी छापील किंमत आहे.
मुंबई : 'ठाकरे' सिनेमा निर्मात्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. ठाकरे सिनेमाच्या हिंदी चित्रपटाची कॉपी लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. या कॉपी वर cinevood असे लिहिले आहे. तसेच oFilmywap.Club लिहिले आहे.
ही प्रिंट सिनेमाची थिएटर प्रिंट असल्याची प्राथमिक माहिती आहे. सिनेमाचे निर्माते शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही याबद्दल माहिती मिळाली असून ते याबाबत सायबर सेलकडे रितसर तक्रार करणार आहे.
तर दुसरीकडे मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी चंदुलाल भाईचंद शेठ या आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून पोलिसांनी ठाकरे सिनेमाच्या 49 सीडी जप्त केल्या आहेत. सीडीवर 149 रुपये अशी छापील किंमत आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. त्यामुळे शिवसैनिक आणि बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्यांसाठी लाखो लोकांनी दोन दिवसांपासून ठाकरे सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये मोठी गर्दी केली होती. मात्र हिंदी कॉपी लीक झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक असलेला 'ठाकरे' चित्रपट शुक्रवारी (25 जानेवारी) रोजी आपल्या भेटीस आला आहे. पहिल्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी 'ठाकरे' चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल झाले. महाराष्ट्रभर पहाटेपासूनच चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांनी रांगा लावल्या होत्या. त्यामुळे हा चित्रपट हिट होणार हे चित्र कालच स्पष्ट झाले होते.
संबंधित बातम्या
ठाकरे - झंजावातामागचा माणूस शोधण्याचा प्रयत्न
'ठाकरे' सिनेमाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोला तुडुंब गर्दी
'ठाकरे' स्क्रीनिंगला मानापमान नाट्य, संजय राऊत यांची सारवासारव