एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'ठाकरे'च्या स्क्रीनिंगला संजय राऊत-अभिजीत पानसेंमध्ये खडाजंगी
'ठाकरे' चित्रपटाच्या स्क्रीनिंगला पोहचायला दिग्दर्शक अभिजीत पानसे यांना उशीर झाला. मात्र पानसे आणि त्यांच्या कुटुंबीयांना बसायला नीट जागा देण्यात आली नाही.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' सिनेमाचं स्क्रीनिंग त्यांच्या जयंतीला करण्यात आलं. मात्र या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या स्क्रीनिंगला किनार होती शिवसेना-मनसेतील छुप्या वादाची. मनसे नेते असलेले दिग्दर्शक अभिजीत पानसे आणि शिवसेना खासदार असलेले चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांच्यामध्ये स्क्रीनिंगवेळी बाचाबाची झाल्याची माहिती आहे.
मुंबईतील वरळी आयनॉक्समध्ये आज संध्याकाळी साडेसात वाजता ठाकरे सिनेमाचं स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. स्क्रीनिंगला पोहचायला अभिजीत पानसे यांना उशीर झाला. मात्र दिग्दर्शक असूनही अभिजीत पानसे आणि त्यांच्या कुटुंबीयांना बसायला नीट जागा देण्यात आली नाही. निर्माते आणि प्रिमियरच्या आयोजकांनी दिलेल्या वागणुकीमुळे पानसे काहीसे नाराज झाल्याची माहिती आहे.
थिएटरमध्ये आपल्याला पहिल्या रांगेत जागा दिल्याचा दावा अभिजीत पानसेंनी केला आहे, तर मान्यवर आणि विशेष निमंत्रितांची विशेष आसनव्यवस्था करण्यात आली होती. पानसे उशिरा आल्यामुळे तोपर्यंत सीट्स उरल्या नव्हत्या, असं निर्मात्यांचं म्हणणं आहे.
नाराज झालेल्या अभिजीत पानसे यांनी स्क्रीनिंग अर्ध सुरु असतानाच काढता पाय घेतला. यावेळी थिएटरबाहेर पानसे आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचीही माहिती आहे. ठाकरे चित्रपटाच्या प्रमोशनमधून डावलल्याची खदखद अभिजीत पानसेंच्या मनात आधीपासूनच होती.
'मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शित केलेल्या ठाकरे चित्रपटाला शुभेच्छा,' असा मजकूर असलेलं पोस्टर मनसेतर्फे लावण्यात आलं होतं. नवाझुद्दीन सिद्दीकी या सिनेमात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारत असून अभिनेत्री अमृता राव माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या 25 जानेवारीला मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या
बाळासाहेब ठाकरे 'अॅक्सिडेंटल शिवसेनाप्रमुख' नव्हते : संजय राऊत नवाजुद्दीन सिद्दीकी आणि संजय राऊत 'माझा' कट्ट्यावर ठाकरे सिनेमातील 'आया रे सबका बापरे...' गाणं प्रदर्शितसत्तर रुपयांचा 'शिववडा' खात थिएटरमध्ये 'ठाकरे' पाहा!
'ठाकरे' साठी दोन हिंदी चित्रपटांच्या तारखा पुढे ढकलल्या!
'ठाकरे' सिनेमातील संवादावर अभिनेता सिद्धार्थचा आक्षेप
'ठाकरे' व्यतिरिक्त कोणताही सिनेमा रिलीज होऊ देणार नाही : बाळा लोकरे
बायोपिकच्या सिक्वलचाही विचार, 'ठाकरे' च्या ट्रेलर लॉन्चिंगला दिग्गजांची उपस्थिती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement