Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya OTT : शाहिद-कृतीचा 'तेरी बातों मे ऐसा उलझा जिया' OTT वर झळकला; कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहाल सायफाय चित्रपट
Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya OTT : यंदाच्या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत हा चित्रपट सातव्या क्रमांकावर आहे. बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवल्यानंतर आता ओटीटीवर रिलीज झाला आहे.
OTT Release : अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि कृती सेनन यांचा सायन्स फिक्शन असलेला रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'तेरी बातों मे ऐसा उलझा जिया' (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya) या वर्षाच्या सुरुवातीला रिलीज झाला. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर भरभरून प्रतिसाद मिळाला. यंदाच्या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत हा चित्रपट सातव्या क्रमांकावर आहे. बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवल्यानंतर आता ओटीटीवर रिलीज झाला आहे.
70 मिमी स्क्रीनवर चित्रपट रसिकांना मोठा अनुभव दिल्यानंतर, शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनचा सायन्स फिक्शन रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' अखेर प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
'तेरी बातों मे ऐसा उलझा जिया' ओटीटी रिलीज
शाहिद कपूरने इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत घोषणा केली. प्राइम व्हिडीओ इंडियाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून चित्रपटाचे पोस्टर शेअर करत ओटीटी रिलीजची माहिती दिली.
View this post on Instagram
चित्रपटाची कथा काय?
'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' चित्रपटात स्मार्ट रोबोटिक्स इंजिनिअर आर्यन अग्निहोत्रीची (शाहिद कपूर) गोष्ट आहे. आर्यन हा त्याची मावशी उर्मिला शुक्लाकडून (डिंपल कपाडिया) रोबोटिक्स शिकतो. सुपर इंटेलिजेंट फिमेल रोबोट ऑटोमेशन उर्फ सिफ्राला (क्रिती सॅनन) भेटल्यानंतर, तो तिच्या प्रेमात पडतो. त्यानंतर घडत असलेल्या गमतीजमती या चित्रपटात आहेत.