एक्स्प्लोर

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या - 

11 लाखांच्या पैठणीचा मान रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणेंना; आता सुरू होणार 'खेळ सख्यांचा चारचौघींचा'

 दार उघड वहिनी...दार उघड...असं म्हणत आदेश बांदेकरांनी 'होम मिनिस्टर' हा कार्यक्रम सुरू केला. पण गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाने म्हणजेच 'महामिनिस्टर'ने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. नुकताच 'महामिनिस्टर'चा महाअंतिम सोहळा पार पडला. महाराष्ट्राच्या महापैठणीच्या मानकरी लक्ष्मी ढेकणे ठरल्या आहेत. 

Karkhanisanchi Waari : एबीपी स्टुडिओची सह-निर्मिती असलेल्या 'कारखानीसांची वारी'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

'पावनखिंड', 'झिम्मा' नंतर आता एबीपी स्टुडिओची सह-निर्मिती असलेल्या 'कारखानीसांची वारी' या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. रविवारी 3 जुलैला दुपारी एक वाजता प्रवाह पिक्चरवर प्रेक्षकांना हा सिनेमा पाहायला मिळणार आहे. 

Amol Kolhe : मराठी स्वाभिमानाचा अंगार...काल, आज आणि उद्याही... अमोल कोल्हेंनी केली 'शिवप्रताप-गरुडझेप' सिनेमाची घोषणा

अनेक ऐतिहासिक मालिका आणि सिनेमांमध्ये डॉ. अमोल कोल्हेंनी काम केलं आहे. तर दर्जेदार ऐतिहासिक मालिकांची आणि सिनेमांची निर्मितीदेखील अमोल कोल्हेंनी केली आहे. आता अमोल कोल्हेंनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. 'शिवप्रताप-गरुडझेप' असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा टीझरदेखील प्रदर्शित झाला आहे.  

'जुग जुग जियो'ला मिळतोय प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद!

बॉलिवूड स्टार्स वरुण धवन, कियारा अडवाणी, नीतू कपूर आणि अनिल कपूर यांचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'जुगजुग जियो'ला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या बॉलिवूड चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 9.28 कोटींची कमाई करत यशस्वी घौडदौड सुरु केली आहे. 'जुग जुग जियो' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’मधून ‘अरुंधती’ने घेतला ब्रेक! 

‘आई कुठे काय करते’ या मालिकेचं कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. या मालिकेत सध्या बरीच भावनिक गुंतागुंत पाहायला मिळत आहे. त्यामुळेच कथानक आणखी उत्कंठावर्धक झालं आहे. मात्र, मालिका टर्निंग पॉईंटला असताना मालिकेत अरुंधतीची अनुपस्थिती प्रेक्षकांना खटकत होती. अरुंधती का दिसत नाहीये, तिने मालिका सोडली का? चाहत्यांकडून वारंवार असे प्रश्न विचारले जात होते. मात्र, मालिकेत अरुंधती का दिसत नाहीये याचा खुलासा नुकताच झाला आहे.

सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी मनकिरत औलखला क्लीन चिट

पंजाब गायक सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी गायक मनकिरत औलखला क्लीन चिट दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्यांना औलख यांच्याविरोधात कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. गायक मनकिरत औलखवर सिद्धू मुसेवाला यांची माहिती गुंडांना दिल्याचा आरोप होत होता.

Anek OTT Release : आयुष्मान खुरानाचा 'अनेक' नेटफ्लिक्सवर रिलीज

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा 'अनेक' हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला. सिनेमागृहात फारशी जादू दाखवू न शकलेला हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. 'अनेक' हा सिनेमा प्रेक्षक आता नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. 

‘भिडे मास्तरां’च्या लेकीने सोशल मीडियावर शेअर केला बोल्ड लूक

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ सध्या प्रचंड चर्चेत आहे. यातील अनेक कलाकारांनी आता मालिकेला रामराम केला आहे. मात्र, या मालिकेतून बाहेर पडल्यानंतरही कलाकार प्रचंड चर्चेत असतात. यापैकीच एक नाव म्हणजे निधी भानुशाली. निधीने या मालिकेत ‘भिडे मास्तरां’ची लेक ‘सोनू’ची भूमिका केली होती. अर्थात काही कारणास्तव तिने काही वर्षांपूर्वी ही मालिका सोडली आहे. मात्र, तरीही चाहते तिला ‘सोनू’ म्हणूनच ओळखतात.

Tejaswini Pandit : आईला मिळाला ‘बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार'; तेजस्विनी पंडितने भावूक पोस्ट शेअर करत दिली माहिती

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने अनेक मराठी मालिका, सिनेमे आणि वेबसीरिजमध्ये काम केलं आहे. तेजस्विनी प्रमाणे तिची आई म्हणजेच ज्योती चांदेकरदेखील मराठी मनोरंजनसृष्टीतील एक अभिनेत्री आहेत. आता ज्योती चांदेकर यांना मानाच्या ‘बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. तेजस्विनीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

Pushpa The Rule : ‘पुष्पा 2’साठी अल्लू अर्जुनने वाढवलं वजन? अभिनेत्याचे नवे फोटो पाहून चाहते झाले अवाक्!

साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनचा 'पुष्पा : द राईज' हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट झाल्यानंतर आता चाहते त्याच्या पुढच्या भागाची अर्थात ‘पुष्पा : द रुल’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून, अल्लू अर्जुन त्यासाठी खूप मेहनत घेत आहे. नुकताच अल्लू अर्जुन या चित्रपटाच्या सेटवर स्पॉट झाला. यावेळी अभिनेता वाढलेले केस आणि दाढीसह ‘पुष्पा’ लूकमध्ये दिसला. मात्र, यावेळी त्याने वजन प्रचंड वाढलेले दिसले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी

व्हिडीओ

Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार
Ashish Shelar Majha Katta : ठाकरे की पवार, भाजपसोबत कोण येणार, राजकारणात नवा बॉम्ब : माझा कट्टा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Embed widget