Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Madhuri Dixit : माधुरी दीक्षितसाठी लेकरांचा मेसेज, व्हिडिओ पाहून अश्रू अनावर; बहिण बोलतानाही भावना अनावर


Madhuri Dixit : बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. माधुरीचा 15 मे रोजी वाढदिवस असून यंदाचा तिचा बर्थडे खूपच खास असणार आहे. 'डान्स दीवाने सीझन 4' (Dance Deewane 4) या कार्यक्रमाचा या आठवड्यातील आगामी भाग खूपच खास असणार आहे. या कार्यक्रमाच्या मंचावर अनोख्या अंदाजात माधुरी दीक्षितचा वाढदिवस साजरा होणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो आता समोर आला आहे. प्रोमोमध्ये माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने (Dr. Shriram Nene) दिसून येत आहेत. तसेच तिच्या दोन मुलांनी तिच्यासाठी एक खास संदेश पाठवला आहे. मुलांचा संदेश वाचून माधुरीला अश्रू अनावर झाले आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Pravin Tarde : "परिस्थिती जेवढी बिकट, हिंदू तेवढाच तिखट"; प्रवीण तरडेंचं पुण्यात वक्तव्य


Pravin Tarde : पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचारासाठी महायुतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या सभेला हजेरी लावली आहे. या सभेत प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी केलेलं भाषण चांगलच गाजलं. दरम्यान कोणीतरी पुण्याचा रंग बदलण्याचा प्रयत्न करतंय असा दावा प्रवीण तरडे यांनी केला. मुळशीचा सुपुत्र म्हणून आवाहन करतो खंबीर नेतृत्व पुण्याला द्या, असं आवाहन त्यांनी पुण्याच्या नागरिकांना केलं. परिस्थिती बिकट, हिंदू तेवढाच तिखट. मैत्रीचा पॅटर्न असाच चालू राहील. सालस, सज्जन, सुशिक्षित नेतृत्व आपल्याला हवं, असं प्रवीण तरडे म्हणाले.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Abdu Rozik Got Engaged : 'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकचा पार पडला साखरपुडा! फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज; 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात


Abdu Rozik Engagement Photos : 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम अब्दु रोझिक (Abdu Rozik) सध्या चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील वादग्रस्त लोकप्रिय कार्यक्रम अर्थात 'बिग बॉस'च्या माध्यमातून दरवर्षी कोणी ना कोणी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्टार होतो. 'बिग बॉस 16'मध्ये (Bigg Boss 16) अब्दु रोझिक झळकला होता. बिग बॉसच्या माध्यमातून अब्दु भारतात चांगलाच लोकप्रिय झाला. या कार्यक्रमात अनेकदा त्याने प्रेम आणि एकटेपणाबद्दल भाष्य केलं आहे. अब्दुची उंची 3 फुट असल्याने एकही मुलगी त्याच्यासोबत लग्न करण्यात तयार नव्हती. पण अब्दुच्या आयुष्यात आता एका मुलीची एन्ट्री झाली आहे. अब्दु लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Virat Kohli Anushka Sharma : गाई-म्हशीचं नाही तर विराट-अनुष्का पितात 'हे' खास दूध; आहेत लाभदायक फायदे


Virat Kohli Anushka Sharma Drinks Almond Milk Benefits : भारतीय क्रिकेट टीमचा दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी तसेच बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. विराट आणि अनुष्का दोघेही विगन डाएटवर आहेत. दोघांनी प्राण्यांपासून मिळणारं प्रोटीन घेणं बंद केलं आहे. प्राण्यांपासून मिळणारं प्रोटीन म्हणजे ते नॉन-व्हेजसह गायी, म्हशी, बकरी यांचं दूध, दही, पनीर या गोष्टींचा त्यांचा डाएटमध्ये सेवन करत नाहीत. प्रोटीनयुक्त पदार्थ खाणं विराट-अनुष्का टाळतात. त्यामुळे त्यांना प्रोटीन कसं मिळतं असा प्रश्न तुम्हाला पडलं असेल. जाणून घ्या जोडपं कोणत्या गोष्टीच्या माध्यमातून प्रोटीन मिळवतात...


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Laila Khan : अभिनेत्री लैला खानचा सावत्र वडिलांनीच केला खून; मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल


Laila Khan : अभिनेत्री लैला खान (Laila Khan) आणि तिच्या कुटुंबियांच्या हत्या प्रकरणात परवेज तक दोषी ठरला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. साल 2011 मध्ये लैला खान आणि तिच्या कुटुंबातील पाच सदस्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. घटनेच्या 14 वर्षांनंतर परवेजला कोर्टाने दोषी ठरवलं आहे. या खटल्यात 40 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. हत्या करुन मृतदेह इगतपुरीच्या एका फार्म हाऊसमध्ये पुरल्याचं उघड झालं आहे. घटनेच्या एक वर्षानंतर सर्व मृतदेह सापडले. परवेज तक हा लैला खान आणि कुटुंबियांसोबत असायचा. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा