Salman Khan on Aishwarya Rai : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) सध्या आपल्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. अशातच आता बॉलिवूडचा सिने-निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा (Karan Johar) एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. करण जोहर या व्हिडीओमध्ये सलमान खानला प्रश्न विचारताना दिसत आहे. करणने सलमानला त्याची एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि कतरिना कैफबद्दल (Katrina Kaif) एक प्रश्न विचारला आहे. करण जोहरने या प्रश्नाचं दिलेलं उत्तर सर्वांनाच हैरान करणारं आहे. 


सलमानच्या उत्तराने वेधलं लक्ष


करण जोहर आणि सलमान खानचा व्हिडीओ रेडिटवर समोर आला आहे. सलमान खानने करण जोहरचा रिअॅलिटी शो 'कॉफी विथ करण'मध्ये हजेरी लावलेली त्यावेळचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये करण सलमानला विचारतो की ऐश्वर्या राय बच्चन आणि कतरिना कैफमध्ये सर्वात जास्त सुंदर कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना सलमान खान पहिल्यांदा ऐश्वर्या राय बच्चनचं नाव घेतो. त्यानंतर कतरिना कैफला तो सुंदर म्हणतो. मजेशीर अंदाजात उत्तर देत सलमान म्हणतो,"पाहूयात आता यांच्या (कतरिना कैफ) नावापुढे कोणाचं नाव लागतंय".


सलमानची लव्हस्टोरी (Salman Khan Lovestory) 


संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या राय आणि सलमान खान एकमेकांना पसंत करू लागले होते. दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. पण काही काळाने त्यांचा ब्रेकअप झाला आणि एप्रिल 2007 मध्ये ऐश्वर्या-अभिषेक लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या चार वर्षांनी ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला. दुसरीकडे कतरिनाचं नावदेखील अनेकदा सलमान खानसोबत जोडलं जातं. सलमान आणि कतरिना एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते, असे म्हणटे जाते. पण तीन वर्षांपूर्वी कतरिना विकी कौशलसोबत लग्नबंधनात अडकली. 


सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रेमाचे किस्से जगजाहीर आहेत. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्यासोबतच्या नात्याबद्दल बोलताना सलमान खान म्हणाला होता,"या गोष्टीला आता अनेक दिवस झाले आहेत. आता या गोष्टींना उजाळा देऊन काहीही उपयोग नाही. ते दिवस विसरणं जास्त चांगलं आहे. ज्या व्यक्तीवर तुमचं प्रेम असतं तो तुमच्यापासून वेगळा झाल्यावर दु:खी असेल तर तुम्हाला वाईट वाटतं. दुसरीकडे तो व्यक्ती आनंदी असेल तर तुम्हालाही आनंद होतो. अभिषेक बच्चन एक चांगला व्यक्ती आहे". 


संबंधित बातम्या


Salman Khan Sister Divorced : तुला घटस्फोट हवाय? सलमान खानच्या बहिणीला नवऱ्याचा सवाल; म्हणाला 'मी त्यानंतर...'