Virat Kohli Anushka Sharma Drinks Almond Milk Benefits : भारतीय क्रिकेट टीमचा दिग्गज खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी तसेच बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. विराट आणि अनुष्का दोघेही विगन डाएटवर आहेत. दोघांनी प्राण्यांपासून मिळणारं प्रोटीन घेणं बंद केलं आहे. प्राण्यांपासून मिळणारं प्रोटीन म्हणजे ते नॉन-व्हेजसह गायी, म्हशी, बकरी यांचं दूध, दही, पनीर या गोष्टींचा त्यांचा डाएटमध्ये सेवन करत नाहीत. प्रोटीनयुक्त पदार्थ खाणं विराट-अनुष्का टाळतात. त्यामुळे त्यांना प्रोटीन कसं मिळतं असा प्रश्न तुम्हाला पडलं असेल. जाणून घ्या जोडपं कोणत्या गोष्टीच्या माध्यमातून प्रोटीन मिळवतात...
विराट-अनुष्का पितात 'हे' पितात (Virat Kohli Anushka Sharma Drinks Almond Milk)
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली बदामाचं दूध पितात. बदामाचं दूध ते स्वत: आपल्या घरी बनवतात. बदामाचं दूध बनवण्याची प्रक्रियादेखील खूप सोपी आहे. अनुष्काने एका व्हिडीओच्या माध्यमातून बदामाचं दूध बनवण्याची रेसिपी चाहत्यांसोबत शेअर केली होती. अनुष्का रात्रभर बदाम पाण्यात भिजत घातले. आणि सकाळी त्याचे साल काढून मिक्सरला लावते. विराट कोहली प्रोटीनसाठी पालेभाज्या खातो. त्याव्यतिरिक्त तो प्रोटीन शेक आणि खूप फळंदेखील खातो. आपल्या विगन डाएटबाबत तो प्रचंड स्ट्रिक्ट आहे.
बदामाच्या दूधाचे फायदे (Almond Milk Benefits)
बदामाच्या दूधामुळे शरीरातील रोग प्रतिकार क्षमता वाढते. बदामामध्ये कॅल्शियम, मॅग्नीशियम, व्हिटॅमिन क, व्हिटॅमिन ई भरपूर असतं. हे सर्व पोषक तत्त्व शरीराला स्वस्थ ठेवण्यात मदत करतात. त्वचा आणि केसांसाठीदेखील हे दूध फायदेशीर आहे. बदामाच्या दूधामुळे शरीराला व्हिटॅमिन डीदेखील मिळतं. इम्युनिटीला स्ट्राँग करण्यात हे दूध मदत करतं. तुम्ही दररोज बदामाच्या दूधाचं सेवन केलं तर तुम्हाला कधीच कॅल्शियमची कमी जाणवणार नाही. मधुमेह असणार्या लोकांनी बदामाचं दूध प्यायला हवं. बदामाच्या दूधात गोडाचं प्रमाण खूप कमी असतं आणि त्यात खूप फायबर असतं.
अनुष्का-विराटचं फिटनेस सीक्रेट (Anushka Sharma Virat Kohli Fitness Secret)
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आपल्या फिटनेसमुळे कायमच चर्चेत असतात. ग्राजिया इंडियासोबत बोलताना अनुष्काने खुलासा केला होता की,पती विराट कोहली आपल्या मित्रांपेक्षा वेगळं आयुष्य जगतो. दररोज संध्याकाळी 6 वाजता तो जेवण करतो आणि 9.30 पर्यंत झोपतो". विराटला अंडी खायला प्रचंड आवडायचं पण विगन झाल्यापासून त्याने या सर्व गोष्टींचा त्याग केला आहे.
संबंंधित बातम्या