Laila Khan : अभिनेत्री लैला खान (Laila Khan) आणि तिच्या कुटुंबियांच्या हत्या प्रकरणात परवेज तक दोषी ठरला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. साल 2011 मध्ये लैला खान आणि तिच्या कुटुंबातील पाच सदस्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. घटनेच्या 14 वर्षांनंतर परवेजला कोर्टाने दोषी ठरवलं आहे. या खटल्यात 40 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. हत्या करुन मृतदेह इगतपुरीच्या एका फार्म हाऊसमध्ये पुरल्याचं उघड झालं आहे. घटनेच्या एक वर्षानंतर सर्व मृतदेह सापडले. परवेज तक हा लैला खान आणि कुटुंबियांसोबत असायचा. 


नेमकं प्रकरण काय? 


अभिनेत्री लैला खानच्या सावत्र वडिलांचं नाव परवेज ताक आहे. अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबियांच्या 2011 मधील हत्याकांडप्रकरणी लैलाच्या सावत्र वडिलांनी सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. खुनाचा कट रचने, खून करणे, पुरावे नष्ट करणे याप्रकरणी न्यायालयाने परवेजला दोषी ठरवलं आहे. परवेज हा लैलाच्या आईचा तिसरा पती होता. फेब्रुवारी 2011 मध्ये हे हत्याकांड उघडकीस आलं होतं. परवेजने लैलाच्या आईच्या मालमत्तेवरुन झालेल्या वादानंतर आधी तिची नंतर लैला आणि तिच्या चार भावंडांची हत्या केली होती. असा पोलिसांचा आरोप आहे. 
 
लैलाने केलंय राजेश खन्नासोबत काम


रेशमा पटेल अर्थात लैला खानचा जन्म 1978 मध्ये झाला आहे. लैलाने 2002 मध्ये कन्नड फिल्म मेकअपच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. अभिनेत्रीने 2008 मध्ये 'वफा ए डेडली' या लव्हस्टोरी असलेल्या चित्रपटात राजेश खन्नासोबत (Rajesh Khanna) काम केलं. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट जोरदार आपटला. 2011 मध्ये अभिनेत्रीची हत्या करण्यात आली. 


कोण आहे लैला खान? (Who is Laila Khan)


लैला खानचं खरं नाव रेश्मा पटेल (Reshma Patel) असं आहे. लैला खानने 'वफा : अ डेडली लव्ह स्टोरी'च्या माध्यमातून 2008 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती राजेश खन्नासोबत झळकली. या चित्रपटांतील बोल्ड सीन्समुळे लैला चर्चेत आली. लैला खान आणि राजेश खन्ना यांच्यातील बोल्ड सीन्स या चित्रपटासाठी चित्रीत करण्यात आले होते. 30 जानेवारी 2011 मध्ये लैलाची हत्या झाली. मुनीर खानसोबत अभिनेत्रीचं लग्न झालं होतं. नादिर शाह पटेल हे लैलाच्या वडिलांचं नाव असून शेलिना पटेल असं तिच्या आईचं नाव आहे. 


संबंधित बातम्या


Bollywood Actress : कधी बोल्डनेस, तर कधी थेट टिप्पणी; जेव्हा लोकप्रिय अभिनेत्रींनी बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या