Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Sushant Singh Rajput Birth Anniversary : सुशांत सिंह राजपूत आजही चाहत्यांच्या मनात जिवंत; 'असा' होता अभिनेत्याचा सिनेप्रवास


Sushant Singh Rajput : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेता  हयात नसला तरी त्याच्या कलाकृतींच्या माध्यमातून तो आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. सुशांतचा मृत्यू प्रकरणावरुन मोठा गदारोळ उडाला. पण आजही त्याच्या मृत्यूचं गूढ कायम आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Article 370 Teaser : आर्टिकल 370 चा टीझर आऊट, दहशतवाद्यांचा खात्मा करताना दिसणार यामी गौतम


Article 370 Teaser : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम सध्या 'आर्टिकल 370' (Article 370) या तिच्या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात यामी गुप्तहेर खात्यातील एक अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा आर्टिलक 370 (Article 370) म्हणजेच जम्मू-काश्मीरचा (Jammu Kashmir) विशेष दर्जा हटवण्याच्या स्टोरीवर आधारित आहे. निर्मात्यांनी शनिवारी (दि.21) या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केलाय. या ट्रेलरमध्ये यामी गौतम (Yami Gautam) दहशतवाद्यांशी लढताना दिसत आहे. निर्मात्यांनी शुक्रवारी (दि.20) सिनेमाचे पोस्टर पोस्ट केले होते. त्यानंतर या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Sridevi Prasanna : "दिल में बजी गिटार"; सई ताम्हणकर-सिद्धार्थ चांदेकरच्या 'श्रीदेवी प्रसन्न' सिनेमातील नवं गाणं आऊट


Sridevi Prasanna New Song Out : सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) अभिनीत 'श्रीदेवी प्रसन्न' (Sridevi Prasanna) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच आता या सिनेमातील 'श्रीदेवी प्रसन्न' (Sridevi Prasanna) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'चे 'TOP 5' स्पर्धक कोण? धमाकेदार असणार ग्रँड फिनाले


Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचा कोण विजेता होणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा


Anupam Kher : "जय श्री राम! 'या' दिवसाची खूप वाट पाहिली"; अयोध्येला जाताना अनुपम खेर यांना अश्रू अनावर


Anupam Kher Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठापनेची देशभर जय्यत तयारी सुरू आहे. देशात राममय वातावरण निर्माण झालं आहे. राजकारणी नेत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) अयोध्येला (Ayodhya) रवाना झाले आहेत. ज्या दिवसाची एवढी वर्षे वाट पाहिली तो दिवस अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्याने त्यांना अश्रू अनावर झाले आहेत.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा