Sushant Singh Rajput Birth Anniversary : सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाला तीन वर्षे झाली आहेत. आज सुशांतची 38 वी जयंती आहे. चाहत्यांसह कुटुंबियांनाही अभिनेत्याची आठवण येत आहे. दरम्यान सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीदेखील (Rhea Chakraborty) सुशांतच्या आठवणीत भावूक झाली आहे. अभिनेत्याच्या जयंतीनिमित्त तिने खास फोटो शेअर केला आहे.
रिया चक्रवर्तीने शेअर केला सुशांतचा 'तो' फोटो
सुशांतच्या जयंतीनिमित्त रिया चक्रवर्तीने इंस्टा स्टोरीवर खास फोटो शेअर केला आहे. तिने सुशांतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अभिनेता खूपच आनंदी दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने हार्ट इमोजीदेखील दिलं आहे. रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीनेदेखील सुशांतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शोविक आणि सुशांत एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.
श्वेता सिंहदेखील भावूक
सुशांतच्या जयंतीला त्याची बहीण श्वेता सिंहदेखील भावूक झाली आहे. भावाचा फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,"माझ्या सोन्यासारख्या भावाला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा. तुझ्यावरचं माझं प्रेम अनंत राहो. तुझा लाखोंचा चाहतावर्ग आहे. त्यांना प्रेरणा देण्याचं काम तू कायमच करत आला आहेस. तू कायम चमकत राहा आणि दिशा दाखवण्याचं काम करत राहा".
सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती एकमेकांना डेट करत होते. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी रियावर गंभीर आरोप लावण्यात आले होते. 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे येथील भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुशांत मृतावस्थेत आढळून आला होता. सुशांतचे अनेक चाहतेही आज त्याच्या जयंतीनिमित्त खास पोस्ट शेअर करत अभिनेत्याच्या आठवणींना उजाळा देत आहेत.
रिया चक्रवर्ती कोण आहे? (Who is Rhea Chakraborty)
रिया चक्रवर्ती हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. रियाने तुनिगा तुनिगा या तेलुगू सिनेमाच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर मेरे डॉड की मारुती या सिनेमाद्वारे तिने 2013 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आजवर तिने सोनाली केबल’, ‘दोबारा’, ‘हाफ गर्लफ्रेंड’, ‘बँक चोर’, ‘चेहरे’ आणि ‘जलेबी' या सिनेमात आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.
संबंधित बातम्या