Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचा कोण विजेता होणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


'बिग बॉस 17'ला आतापर्यंत सहा फायनलिस्ट मिळाले आहेत. अंकिता लोखंडे, विकी जैन, मुनव्वर फारुकी, अरुण माशेट्टी, मन्नारा चोप्रा आणि अभिषेक कुमार हे 'बिग बॉस 17'चे टॉप सहा फायनलिस्ट आहेत. यातून 'टॉप 5'मध्ये कोण जाणार हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे.


'बिग बॉस 17'चे 'टॉप 5' स्पर्धक कोण?


ऑरमॅक्स मीडियाने 'बिग बॉस 17'च्या 'टॉप 5' स्पर्धकांची यादी जाहीर केली आहे. मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे, अभिषेक कुमार, विकी जैन, मन्नारा चोप्रा हे 'बिग बॉस 17'चे 'टॉप 5' स्पर्धक आहेत. ऑरमॅक्स मीडियाच्या रिपोर्टनुसार, 'बिग बॉस 17'चा विजेता मुनव्वर फारुकी होऊ शकतो. तर अंकिता लोखंडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. 






'बिग बॉस 17'चा ग्रँड फिनाले कधी? (Bigg Boss 17 Grand Finale)


'बिग बॉस 17'चा ग्रँड फिनाले 28 जानेवारी 2024 रोजी पार पडणार आहे. कलर्स चॅनलवर रात्री 9 वाजता प्रेक्षक हा कार्यक्रम पाहू शकतात. तसेच जिओ सिनेमावरही प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहता येईल. 'बिग बॉस 17'चा विजेता होणाऱ्याला 30 ते 40 लाख रुपयांचं बक्षीस मिळू शकतं. ट्रॉफी आपल्या नावे करण्यासाठी घरातील सर्व स्पर्धकांमध्ये चढाओढ होत असलेली पाहायला मिळत आहे. 






'बिग बॉस 17'च्या फिनाले वीकची सुरुवात झाली आहे. आता बिग बॉसच्या घरातील दोन स्पर्धकांचा प्रवास संपला आहे. 'बिग बॉस 17'च्या वीकेंड का वार या स्पेशल एपिसोडमध्ये ईशा मालवीय घराबाहेर पडली आहे. कमी वोट्स मिळाल्यामुळे ईशाला घरातून बाहेर काढण्यात आले आहे. 


संबंधित बातम्या


Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17'च्या विजेत्याचे नशीब फळफळणार; ट्रॉफी, रोख रक्कमसह मिळणार 'हे' धमाकेदार गिफ्ट