Article 370 Teaser : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम सध्या 'आर्टिकल 370' (Article 370) या तिच्या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमात यामी गुप्तहेर खात्यातील एक अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा आर्टिलक 370 (Article 370) म्हणजेच जम्मू-काश्मीरचा (Jammu Kashmir) विशेष दर्जा हटवण्याच्या स्टोरीवर आधारित आहे. निर्मात्यांनी शनिवारी (दि.21) या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केलाय. या ट्रेलरमध्ये यामी गौतम (Yami Gautam) दहशतवाद्यांशी लढताना दिसत आहे. निर्मात्यांनी शुक्रवारी (दि.20) सिनेमाचे पोस्टर पोस्ट केले होते. त्यानंतर या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. 


23 फेब्रुवारीला येणार प्रेक्षकांच्या भेटीला 


आर्टिकल 370 च्या टीझरमध्ये यामी गौतम एका अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. या टीझरमध्ये यामी म्हणते, दहशतवाद एक धंदा आहे. जो स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या भ्रष्ट राजकीय नेत्यांद्वारे चालवलो जातो. हे भ्रष्ट अधिकारी आणि नेते स्व:त वारेवाप पैसा कमावतात. याशिवाय संपूर्ण सिनेमा आर्टिकल 370 रद्द करण्याच्या मागणीवर आधारीत आहे. वास्तविकते प्रमाणे सिनेमातही जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करुन त्याला केंद्रशासित प्रदेश बनवले जाते. हा सिनेमा 23 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


यामीची भूमिका पाहाण्यासाठी चाहते उत्सुक 


सिनेमाचा टिझर जियो स्टुडिओजच्या युट्युब चॅनेलवरती रिलीज करण्यात आलाय. आर्टिकल 370 चे दिग्दर्शन आदित्य सुहास जंभाले यांनी केले आहे. आदित्यने यापूर्वी 2019 मध्ये ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' या सिनेमाचेही दिग्दर्शन केले आहे. बदलापूर, उरी, बाला, ए थर्सडे आणि चोर निकल के भागा यांसारख्या सिनेमात यामीने प्रमुख भूमिका निभावली आहे. आता चाहते गुप्तहेर खात्यातील तिची भूमिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत. बदलापूरमध्ये यामीचा रोल फार कमी कालावधीचा होता. उरीमध्येही तिने गुप्तहेर भारतीय सैन्याचा भाग म्हणून काम केलं होते. त्यामुळे यामीकडे अशा सिनेमांमध्ये काम करण्याचा विशेष अनुभव देखील आहे. 


 










इतर महत्वाच्या बातम्या 


Rashmika Mandanna Vijay Deverakonda : "फेब्रुवारीत साखरपुडा अन् लग्न"; रश्मिका मंदानासोबतच्या नात्याच्या बातम्यांवर विजय देवरकोंडाने सोडलं मौन