Sridevi Prasanna New Song Out : सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) अभिनीत 'श्रीदेवी प्रसन्न' (Sridevi Prasanna) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच आता या सिनेमातील 'श्रीदेवी प्रसन्न' (Sridevi Prasanna) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
'श्रीदेवी प्रसन्न' सिनेमातील 'दिल में बजी गिटार' हे गाणं आऊट!
'श्रीदेवी प्रसन्न' या सिनेमाच्या माध्यमातून सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. टीझर आणि ट्रेलरला मिळालेल्या रिस्पॉन्सने बोल्ड ब्युटीफुल सई व चॉकलेट बॉय सिद्धार्थ यांच्या फिल्मसाठी लोक किती उत्सूक आहेत ते सिद्ध केलं आहेच. येत्या 2 फेब्रुवारीला हा सिनेमा सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
'श्रीदेवी प्रसन्न' या फ्रेश चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल विमल मोढवे आणि लेखन अदिती मोघे यांनी केले आहे. सहकुटुंब सहपरिवार एन्जॉय करता येईल अशी लोकांपर्यंत आणावी हाच या चित्रपटामागचा थॉट आहे.
तगडी स्टारकास्ट असलेला 'श्रीदेवी प्रसन्न'
'श्रीदेवी प्रसन्न' या सिनेमात सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत आहेत. सुलभा आर्य, संजय मोने, वंदना सरदेसाई, शुभांगी गोखले, रमाकांत दायमा यांच्या सारख्या मातब्बर कलाकारांसोबत सिनेमात सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, राहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वानखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे हे तरुण कलाकार देखील महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.
श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाच्या माध्यमातून फील गुड, एन्टरटेनिंग, रोमँटिक कॉमेडी ते पडद्यावर आणत आहेत. ह्या सिनेमाच्या निमित्ताने सुरु झालेला टिप्स सिनेमाचा प्रवास मराठी प्रेक्षकांच्या सोबत पुढेही सुरु राहील याची त्यांना आशा आहे.
'श्रीदेवी प्रसन्न'चं कथानक काय?
'श्रीदेवी प्रसन्न' या सिनेमाचं नाव नुसतं फिल्मी नाही तर याचं कथानकच टोटल फिल्मी म्हणावं लागेल. 'लव एट फर्स्ट साईट' चं स्वप्न मनात बाळगत प्रेमाच्या भन्नाट कल्पना विश्वात वावरणारा प्रसन्न, मॅट्रिमोनी साइटवर 'श्रीदेवी' या नावाच्या उत्सुकतेपोटी तिला रिक्वेस्ट पाठवतो आणि ती अॅक्सेप्ट देखील करते. या दोन टोकांच्या माणसांची मनं जुळतात की नाही,त्या दरम्यान नेमकं काय काय घडतं या कथानकाला 'श्रीदेवी प्रसन्न' चित्रपटाच्या माध्य मातून दिलेला फिल्मी तडका रसिक प्रेक्षकांचे 100 टक्के मनोरंजन करणार यात शंकाच नाही.
संबंधित बातम्या