Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : सोढी गायब, अभिनेत्रीचा असित मोदींवर गंभीर आरोप; 'या' आठ कारणांमुळे चर्चेत आलाय 'तारक मेहता का उल्टा चष्मा'
TMKOC : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय कार्यक्रमात रोशन सिंह सोढीची भूमिका साकारणारा गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) सध्या गायब आहे. त्यामुळे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने हा कार्यक्रम चर्चेत असतो. पण 'या' आठ कारणांमुळे हा कार्यक्रम खूपच चर्चेत आला आहे. अभिनेत्री जेनिफर मिस्त्री (Jennifer Mistry) हिने निर्माते असित मोदी (Asit Modi) यांच्यावर गंभीर आरोप लावले होते ते गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) बेपत्ता होण्यापर्यंत अनेक कारणांनी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' चर्चेत आली आहे.
'या' आठ कारणांनी चर्चेत आलाय 'तारक मेहता का उल्टा चष्मा'
1.)'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत रोशन सिंह सोढीची भूमिका साकारणारा गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे. गुरुचरणच्या वडिलांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
2.) 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत मिसेज सोढीच्या भूमिकेत झळकणारी जेनिफर मिस्त्रीने निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. त्यामुळे निर्मात्यांवर कलम 354 आणि 509 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
3.) मालिकेत बबीताची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता आणि टप्पूच्या भूमिकेत झळकणारा अभिनेता राज अनदकत रिलेशनमध्ये असल्याची बातमी समोर आली होती. दोघांचा साखरपुडा झाल्याचंही समोर आलं होतं. पुढे मुनमुन आणि राजने सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चांना पूर्णविराम दिला.
4.) 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत मेहता साहबच्या भूमिकेत दिसणाऱ्या शैलेश लोढाने 12 वर्षांनी कार्यक्रमाचा निरोप घेतला.
5.) अमित कुमार मोदीच्या मालिकेत बावरीच्या भूमिकेत दिसणाऱ्या मोनिका भदौरियानेदेखील निर्मात्यांवर गंभीर आरोप लावले होते.
6.) 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत डॉक्टर हाथीच्या भूमिकेत झळकणारा अभिनेता कवी कुमारचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. अभिनेत्याने 9 वर्ष मालिकेसाठी काम केलं होतं.
7.) प्रिया आहूजा 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत रिटा रिपोर्टरच्या भूमिकेत झळकली होती. प्रिया आहूजाला काहीही कारण न देता मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.
8.) 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणारी दिशा वकानी उर्फ दयाला रातोरात मालिकेतून बाहेर पडली होती. अभिनेत्री मालिकेत कमबॅक करणार अशा बातम्या अनेकदा समोर येत असतात.
संबंधित बातम्या