(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sachin Shroff Wedding : नवीन तारक मेहता दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात, धुमधडाक्यात झालं लग्न
Sachin Shroff : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारणारा अभिनेता सचिन श्रॉफ दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे.
Sachin Shroff Wedding : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता सचिन श्रॉफ (Sachin Shroff) लग्नबंधनात अडकला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो तारक मेहता या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सचिन श्रॉफचं धुमधडाक्यात लग्न झाले.
सचिन श्रॉफने सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. या फोटोत 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील कलाकार दिसत आहेत. मुनमुन दत्ता, दिलीप जोशी, जेनिफर मिस्त्री बंसीवाल, अंबिका रंजनकर, सुनयना फोजदारचा समावेश होता. सोशल मीडियावर सचिनच्या लग्नसोहळ्याचे फोटो व्हायरल होत आहेत.
सचिन श्रॉफची पत्नी एक इव्हेंट मॅनेजर आहे. ती गेल्या काही वर्षांपासून त्याच्या बहिणीची मैत्रीण आहे. याआधी सचिनचं छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जूही परमारसोबत (Juhi Parmar) लग्न झालं होतं. 15 जानेवारी 2009 साली त्यांचं लग्न झालं. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर लग्नाच्या नऊ वर्षांनंतर जानेवारी 2018 साली त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मुलीचं नाव समायरा आहे.
View this post on Instagram
सचिन श्रॉफबद्दल जाणून घ्या...
सचिन श्रॉफ एक लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक मालिकांच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 'आश्रम' या वेबसीरिजच्या माध्यमातून त्याने ओटीटी विश्वात पदार्पण केलं आहे. 2008 सालापासून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सध्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
सचिन श्रॉफच्या पहिल्या पत्नीबद्दल जाणून घ्या... (Sachin Shroff First Wife)
सचिन श्रॉफची पहिली पत्नी जूही परमार (Juhi Parmar) आहे. एका मालिकेच्या शूटिंगदरम्यान त्यांची भेट झाली होती. या मालिकेदरम्यान त्यांची मैत्री झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जयपूरच्या एका महालात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. पण पुढे दोघांमध्ये सतत मतभेद सुरू झाले आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
संबंधित बातम्या