एक्स्प्लोर

Suyash Tilak: 'मराठी सिनेमे आपल्या महाराष्ट्रातच कमी चालतात'; अभिनेता सुयश टिळकची पोस्ट चर्चेत

नुकतीच अभिनेता सुयश टिळकनं (Suyash Tilak) गोदावरी (Godavari) या चित्रपटाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. 

Suyash Tilak: अभिनेता जितेंद्र जोशीचा (Jitendra Joshi) गोदावरी (Godavari) हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. सध्या चित्रपटाच्या कथानकाचं आणि चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं सध्या अनेक जण कौतुक करत आहेत. या चित्रपटामध्ये जितेंद्र जोशी बरोबरच अभिनेत्री गौरी नलावडे, अभिनेता संजय मोने, अभिनेते विक्रम गोखले यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. नुकतीच अभिनेता सुयश टिळकनं (Suyash Tilak) गोदावरी या चित्रपटाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. 

सुयशनं चित्रपटाचं केलं कौतुक

सुयशनं पत्नी आयुषी टिळक आणि अभिनेता जितेंद्र जोशी यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. या फोटोला सुयशनं खास कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये सुयशनं लिहिलं, '“गोदावरी” साध्या माणसांची साधी सरळ गोष्ट. प्रवाहाबरोबर वाहताना आपण स्वतःला काही वेळा हरवून बसतो, प्रेम देणाऱ्यांना दुरावून बसतो फार उशीर झालाय हे जाणवायच्या आत त्याची जाणीव झाली तर ठीक नाहीतर ही परंपरा चालू राहतेच…'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

मराठी चित्रपटांबाबत देखील सुयशनं पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्यानं पोस्टमध्ये लिहिलं, 'आता मराठी सिनेमे चालवायचे की नाही हे प्रेक्षकांच्या हातात आहे. अलिकडच्या काळात “कशाला चित्रपटगृहात जायचं OTT वर आलं की बघू” अशी रड फक्त मराठी चित्रपटांबाबतीत जास्त ऐकायला/बघायला मिळते. त्याने मराठी सिनेमे आपल्या महाराष्ट्रातच कमी चालतात. काही सिनेमे अपवाद पण ह्यामुळे अलिकडच्या काळात आलेले अनेक दर्जेदार मराठी सिनेमे दुर्दैवाने चित्रपटगृहात फार काळ टिकले नाहीत,ह्याचं दुःख वाटतं. महाराष्ट्रातच मराठी सिनेमे नाही चालले किंवा प्रेक्षकांनी ते हट्टानी नाही चालवले तर काय करणार? पण अश्या निर्मात्यांमुळे व अश्या चित्रपटांमुळे चांगलं काम करता येईल व बघता येईल अशी आशा वाटत राहते.'

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Godavari Movie: 'नदीसाठी, नदीकाठी!'; गोदावरी चित्रपटाच्या टीमनं केली ‘गोदावरी’ नदीची आरती

महत्त्वाच्या बातम्या

Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
Bollywood Actor Pradeep Rawat Struggle Stroy: 'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
Udhayanidhi Stalin on Trisha Krishnan: त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
त्रिशावरील वक्तव्य, उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यासाठी घरी पोहोचले, पत्नी म्हणाली, 10 मिनिटं थांबा, ते टॉयलेटमध्ये आहेत
Brett Lee on Preity Zinta: ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन
ऑस्ट्रेलियाचा तुफानी गोलंदाज ब्रेट ली अभिनेत्री प्रीती झिंटाला डेट करायचा, नक्की खरं काय? माजी क्रिकेटरने सोडलं मौन

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
Embed widget