एक्स्प्लोर

Suyash Tilak Aayushi Bhave : सुयश टिळक अन् आयुशी भावेमध्ये सारं काही आलबेल? कोणी कोणाला केलं अनफॉलो?

Suyash Tilak Aayushi Bhave : अभिनेता सुयश टिळक आयुषी भावेसोबत लग्नबंधनात अडकला आहे. पण आता त्यांच्यात सारं काही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे.

Suyash Tilak Aayushi Bhave : मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता, छोटा पडदा गाजवणाऱ्या सुयश टिळकचा (Suyash Tilak) आज वाढदिवस आहे. एकीकडे अभिनेत्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर दुसरीकडे त्याच्या खास व्यक्तीने मात्र त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या नाहीत. 

सुयश टिळक आणि आयुषी भावेचं बिनसलं? 

अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी भावे 21 ऑक्टोबर 2021 रोजी लग्नबंधनात अडकले. कोरोनाकाळात जवळचे मित्रमंडळी आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांचा लग्नसोहळा पार पडला. सुयश आणि आयुषीचा 7 जुलैला साखरपुडा झाल्यानंतचर ते कधी लग्न करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर सुयश आणि आयुषीने लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. 
पण आता लग्नाच्या तीन वर्षांनंतर सुयश आणि आयुषीचं बिनसलं असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

कोणी कोणाला केलं अनफॉलो?

सुयश टिळक आणि आयुषी भावे दोघेही सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांनी एकमेकांसोबतचे फोटो शेअर केलेले नाहीत. आयुषी भावेने तिचं यूझर नेम ‘आयुषी भावे टिळक’ असंच ठेवलं आहे. तसेच ती सुयश टिळकला फॉलोदेखील करते. पण सुयश टिळकने मात्र आयुषीला अनफॉलो केलं आहे. त्यामुळे आता सुयश आणि आयुषीचा घटस्फोट होणार का? असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.

Suyash Tilak Aayushi Bhave : सुयश टिळक अन् आयुशी भावेमध्ये सारं काही आलबेल? कोणी कोणाला केलं अनफॉलो?
Suyash Tilak Aayushi Bhave : सुयश टिळक अन् आयुशी भावेमध्ये सारं काही आलबेल? कोणी कोणाला केलं अनफॉलो?

आयुषीआधी पाठकबाईंसोबत रिलेशनमध्ये होता सुयश टिळक

आयुषी भावेसोबत संसार थाटण्याआधी सुयशचं नाव पाठकबाई अर्थात ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अक्षय देवधरसोबत (Akshaya Deodhar) जोडलं गेलं होतं. त्यांनी त्यांच्या नात्याला अधिकृत दुजोरा दिला नव्हता. पुढे अक्षया आणि सुयशचं बिनसलं आणि त्यांचा ब्रेकअप झाला. अक्षया आणि सुयशने एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावरुन डिलीट केले. तसेच एकमेकांना अनफॉलोदेखील केलं. 

सुयश टिळकबद्दल जाणून घ्या... (Who is Suyash Tilak)

सुयश टिळक हा मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. ‘का रे दुरावा’ या मालिकेत त्याने साकारलेली ‘जय’ ही भूमिका चांगलीच गाजली. या मालिकेच्या माध्यमातून त्याला घराघरांत ओळख मिळाली. ‘का रे दुरावा’सह ‘बापमाणूस’, ‘सख्या रे, ‘पुढचं पाऊल’ ‘दुर्वा’, ‘शुभमंगल ऑनलाईन’ अशा अनेक मालिकांमध्ये तो महत्त्वाच्या भूमिकेत झळकला आहे. 

पुणेकर असलेल्या सुयशचं शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालं आहे. ‘अमर प्रेम’ या मालिकेच्या माध्यमातून त्याने छोट्या पडद्यावर पाऊल ठेवलं. सुयशने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण सध्या तो वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतारांमुळे चर्चेत आहे.

संबंधित बातम्या

Suyash Tilak : 'अबोली' मालिकेत सुयश टिळकची धमाकेदार एन्ट्री; 'या' भूमिकेत दिसणार अभिनेता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतराAnandache Paan: 'गोष्ट पैशापाण्याची' नंतर Prafull Wankhede यांचं 'ओके सॉरी थँक्यू' नावाचं नवं पुस्तकNitin Gadkari Speech Shirdi : शिवशाही स्थापन करण्यासाठीच जनतेनं अभूतपूर्व यश दिलं : नितीन गडकरीEknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Food Poisoning : धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
Police Custody : पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
Ravi Rana : आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
Embed widget