एक्स्प्लोर

Sushmita Sen Birthday: मिस युनिव्हर्सला जाणार तोच पासपोर्ट हरवला, ऐश्वर्याला पाठवण्याच्या प्रस्तावावर भडकली सुष्मिता अन्..

ऐनवेळी झालेल्या गोंधळामुळे भारताच्या या स्पर्धेच्या आयोजकांनी केवळ ऐश्वर्याला मिस युनिवर्समध्ये पाठवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हे ऐकून सुष्मिताही राग आला होता असं ती सांगते.

Sushmita Sen Birthday: बॉलिवूडची विश्वसुंदरी असं म्हणल्या म्हणल्या तोंडावर नाव येतं सुष्मिता सेन हिचं! आपल्या अदाकारीनं, आत्मविश्वासानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी सुष्मिता आज तिचा  वाढदिवस साजरा करत आहे. भारताची पहिली विश्वसुंदरी सुष्मिता स्वातंत्र्य आणि स्वत:ची धमक दाखवत जगण्यासाठी ओळखली जाते. जाणून घेऊयात तिच्या आयुष्यातल्या काही इंटरेस्टींग गोष्टी..

१८ व्या वर्षी पटकावला विश्वसुंदरीचा किताब

वयाच्या १८ व्या वर्षी सुष्मितानं मिस युनिवर्सचा किताब जिंकून इतिहास रचला.  भारताकडून जरी सुष्मिता पहिली विश्वसुंदरी ठरली. पण या स्पर्धेसाठी आधी ऐश्वर्या रायला संधी दिली जाणार होती. १९९४ मध्ये झालेल्या मिस युनिवर्स स्पर्धेत पहिल्यांदा भारताची सुष्मिता जाणार होती. पण ऐश्वर्या या स्पर्धेत जाण्याचं कळल्यानंतर अनेक सहभागींसह सुष्मितानंही तिचा या स्पर्धेतला अर्ज मागे घेतला होता. पण, त्याच्या आईने त्याला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. तेव्हा या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला.

ऐश्वर्याला पाठवणार म्हणल्यावर चिडली पण खचली नाही..

मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी जेव्हा तिला फिलिपाइन्सला जायचे होते तेव्हा तिचा पासपोर्ट हरवला होता, असा खुलासा खुद्द सुष्मितानंच एका मुलाखतीत केला होता. ऐनवेळी झालेल्या गोंधळामुळे भारताच्या या स्पर्धेच्या आयोजकांनी केवळ ऐश्वर्याला मिस युनिवर्समध्ये पाठवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हे ऐकून सुष्मिताही राग आला होता असं ती सांगते. इतक्या कठोर परिश्रमांनंतर आणि प्रामाणिक प्रयत्नांनंतर आता माघार योग्य नसल्याचं तिला वाटलं. आणि वडिलांकडे जाऊन मी या स्पर्धेत जाणार असल्याचं सांगत तिनं विश्वसुंदरी होण्याचा मान पटकावला.सुष्मिताच्या आधी कोणत्याही भारतीय महिलेला ही पदवी मिळाली नव्हती. याआधी ही स्पर्धा ४१ वेळा आयोजित करण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे ४२व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत ७७ देशांतील स्पर्धकांनी भाग घेतला होता.

अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर उमटवली मोहर

  • 1994 मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब सुष्मिता सेनच्या नावावर नोंदवला गेला. 2006 मध्ये सुष्मिता सेन यांना राजीव गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
  • 2016 मध्ये सुष्मिता सेनला मिस युनिव्हर्स स्पर्धेची जज देखील बनवण्यात आली होती.
  • सुष्मिता सेनला 2020 साली OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या तिच्या वेब सिरीज "आर्या" मधील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर OTT पुरस्कार मिळाला.

२४ व्या वर्षी मुलगी दत्तक, सिंगल राहण्याचा निर्णय

जेव्हा आपण सिंगल मदरबद्दल बोलतो तेव्हा त्यात सुष्मिता सेनचा नक्कीच समावेश होतो.सुष्मिता सेनला दोन मुले आहेत, पण तिचे लग्न झालेले नाही. सुष्मिताने वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी तिची मोठी मुलगी दत्तक घेतली होती. 10 वर्षांनंतर म्हणजेच 2010 मध्ये त्यांनी त्यांची दुसरी मुलगी अलिशा हिला दत्तक घेतले. सुरुवातीच्या काळात सुष्मिताला तिच्या या निर्णयावर तिच्याविषयी खूप चर्चा झाली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget