'सुशांतची हत्याच', सुशांतच्या कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांचा दावा; एम्सच्या अहवालाची प्रतीक्षा
सुशांत राजपूतचा 14 जूनला मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासात त्याने आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं होतं. परंतु, मुंबई पोलिसांकडून सध्या हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आणि सुशांतच्या मृत्यूचा छडा लावण्यासाठी सीबीआय, ईडी, नार्कोटिक्स ब्युरो अशी मंडळी कामाला लागली.
मुंबई : सुशांतच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी सीबीआयची टीम मुंबईत आल्यानंतर त्यांनी तपासाला जोरदार सुरुवात केली. सुशांतची आत्महत्या होती की, हत्या यावर प्रचंड खल सुरु असतानाच दिल्लीच्या एम्स रुग्णालयातल्या अभ्यासकांची टीम मुंबईत दाखल झाली. प्राथमिक अभ्यास केल्यानंतर सुशांतचा मृत्यू हा होमीसाईड असल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी वर्तवला होता. त्यावर सुशांत सिंह राजपूत याच्या कुटुंबियांचे वकिल विकास सिंह यांनी सुशांतची हत्याच असल्याचा दावा केला आहे. सध्या एम्सचा अहवाल अद्याप आला नाहीय. पण काही दिवसांपूर्वी या पथकाने सुशांतची हत्याच केली आहे, असा दावा केला होता.
सुशांतच्या मृत्यूनंतर काही फोटो व्हायरल झाले होते. त्यात त्याचं पार्थिव पलंगावर ठेवल्यानंतर त्याचे काही फोटो काढण्यात आले होते. ते फोटो पाहून अनेकांनी हा मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याचं वर्तवलं होतं. एम्सच्या डॉक्टरांनीही असाच अंदाज वर्तवला होता. या सगळ्यात मीतू सिंहने काढलेले फोटो महत्त्वाचे ठरत आहेत. यात सुशांतच्या आत्महत्येनंतर मीतू सिंह बांद्र्याच्या फ्लॅटमध्ये गेल्यानंतर तिने वेगळ्या कोनातून सुशांतचे काही फोटो काढले होते. हे फोटो व्हायरल झाले नव्हते. कारण ते फक्त सुशांतच्या कुटुंबियांना माहीत होतं. कुटुंबियांनी ही गोष्ट त्यांच्या वकिलाला सांगितली. कालांतराने हे फोटो एम्सच्या पथकाला दाखवण्यात आले. त्यावेळीही अनौपचारिकरित्या या पथकाने ही हत्याच असल्याचं सांगितलं होतं. सुशांतचा मृत्यू गळा दाबून झाल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी वर्तवला होता. आता विकास दुबे यांनी या अनौपचारिक अंदाजाची आठवण करून दिली आहे.
हे खरं आहे की, एम्सचा अहवाल अद्याप या क्षणापर्यंत आलेला नाही. पण तो कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता आहे. यात सुशांतचा व्हिसेराही आहे. इतक्या काळानंतर सुशांतच्या व्हिसेऱ्याचा केवळ 25 टक्के भागाचीच तपासणी होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांनी आपली पूर्ण ताकद या तपासाला लावली आहे. एकूण या प्रकरणाचं वाढलेलं महत्व आणि हाती असलेले पुरावे लक्षात घेता अत्यंत चिकित्सक पद्धतीने हा तपास सुरु आहे.
सुशांत राजपूतचा 14 जूनला मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासात त्याने आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं होतं. मुंबई पोलिसांनी हा तपास केल्यानंतर त्यावर नाराजी दर्शवत सुशांतच्या कुटुंबियांनी बिहारमध्ये तक्रार दाखल केली. यात रिया चक्रवर्ती सुशांतला फसवत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर हा प्रकार सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. आणि सुशांतच्या मृत्यूचा छडा लावण्यासाठी सीबीआय, ईडी, नार्कोटिक्स ब्युरो अशी मंडळी कामाला लागली.
महत्त्वाच्या बातम्या :
- सुशांत स्वत:च्या नशेची सवय पूर्ण करण्यासाठी सर्वांचा वापर करायचा, तसा त्यानं आमचाही केला : रिया चक्रवर्ती
- रियाने चौकशीदरम्यान कुणाचीही नावे घेतली नाहीत, वकील सतीश मानशिंदे यांचा दावा
- आता टीव्ही कलाकारांचे ड्रग्स कनेक्शन समोर, NCB कडून अबिगेल पांडे, सनम जोहरविरोधात गुन्हा
- दीपिका पदुकोण अमली पदार्थ सेवनाची कबुली देणार?