मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अनेक लोकांची चौकशी केली असून जबाब नोंदवले आहेत. अशातच आता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला एकव वेगळं वळणं लाभलं आहे. कारण सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांना त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे. पटना येथील राजीवनगर पोलीस ठाण्यात रिया विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर पाटना पोलिसांनी याप्रकरणी चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. याआधी मुंबई पोलीस याप्रकरणाची चौकशी करत होते, तसेच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात येणार नसल्याचं महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केलं होतं. परंतु, सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पाटना पोलिसांनी एफआयआर दाखल करत मुंबईत चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणी बिहार पोलिसांनी सुशांत सिंह राजपूतची बहिण मीतू सिंहचा जबाब नोंदवला आहे.


बिहार पोलिसांना दिलेल्या जबाबात सुशांतची बहिण मीतू सिंहने गंभीर आरोप करत सांगितलं की, सुशांतच्या अत्यंत वाईट परिस्थितीच त्याला सोडून गेली होती रिया. सुशांतची बहिण मीतूने बिहार पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये 9 जूनपासून 12 जूनपर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. तिने पोलिसांना सांगितलं की, 8 जून रोजी संध्याकाळी रिया चक्रवर्तीने फोन करून तिच्या आणि सुशांतच्या भांडणाबाबत सांगितलं. त्यानंतर पुढच्या दिवशी त्याची बहिण सुशांतच्या वांद्रे येथील घरी काही दिवसांसाठी राहण्यास गेली.


सुशांतच्या बॅंक खात्यातले कोट्यावधी पैसे गेले कुठे?


बिहार पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबामध्ये मीतूने सांगितलं की, 'सुशांतने मला त्याच्यात आणि रियामध्ये झालेल्या भांडणाबाबत सांगितलं. सुशांतने सांगितलं की, रिया स्वतःचं आणि सुशांतचं काही सामान घेऊन घर सोडून गेली होती. त्यामध्ये सुशांतचा लॅपटॉप, एक मोबाईल आणि काही हार्ड डिस्कचा समावेश आहे. तसेच त्यावेळी घर सोडताना कदाचित पुन्हा परत येणार नसल्याचं सांगितलं. या घटनेमुळे सुशांत दुःखी होता. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मी त्याच्यासोबत चार दिवस राहिले. माझी मुलं छोटी आहेत, त्यामुळे मी 12 जून रोजी पुन्हा परत आले. मी परत येताना सुशांतला समजावलं आणि स्वतःची काळजी घेण्यास सांगितलं.


मीतून पुढे बोलताना सांगितलं की, मला स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की, सुशांत असं पाऊल उचलेलं. दोन दिवसांनी सकाळी मला सिद्धार्थ पिठानीचा फोन आला. त्याने फोनवर सांगितलं की, सुशांत बऱ्याच वेळापासून आपल्या बेडरुमचा दरवाजा उघडत नाहीये. मी पुन्हा वांद्याला जाण्यासाठी रवाना झाले. मी रस्तात सुशांतला फोन लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, काहीच फायदा झाला नाही. वांद्रे येथ पोहोचल्यानंतर एका चावी वाल्याच्या मदतीने सुशांतच्या घराचा दरवाजा उघडला. त्यानंतर सुशांतचा गळफास घेतलेला मृतदेह पाहिला. त्यावेळी मला काहीच कळत नव्हतं की, मी काय करू. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तिथे पोहचून तपास सुरु केला.


महत्त्वाच्या बातम्या :


सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी अंकिता लोखंडेची चौकशी होणार


Sushant Singh Rajput Death Case | रिया चक्रवर्तीची सुप्रीम कोर्टात धाव, सर्वात महागडे वकील लढणार केस


अंकिता लोखंडे म्हणते, विजय सत्याचाच!


सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी आता करण जोहरची चौकशी होणार!


"मी रियाला कधीही सुशांतपासून दूर होण्यास सांगितले नाही" : महेश भट्ट