महेश भट्ट यांनी पोलिस चौकशीत सांगितले की, 'मी रियाला कधीही सुशांतपासून दूर होण्यास सांगितले नाही. सोशल मीडियावर लावण्यात आलेले सर्व आरोप निराधार आहेत. मी माझ्या मुलांच्या वैयक्तिक आयुष्यात कधीही हस्तक्षेप केला नाही, मग मी रियाला का तिच्या जीवनात सल्ले देऊ. बॉलिवूडमध्ये नेपोटिझमवर आरोप ठेवणे चुकीचे आहे. विशेषतः माझ्यावर. मी अनेकदा नवीन दिग्दर्शक आणि कलाकारांना संधी दिली आहे. माझे चित्रपट काढा आणि पहा.
सुशांत सिंह राजपूतच्या भेटीविषयी भट्ट म्हणाले, 2018 मधील माझे यूट्यूब चॅनेल पाहता सुशांतने मला फोन करुन सांगितले की, त्याला मला भेटायचे आहे. सुशांतने म्हटले होते की, मी आपल्या यूट्यूब चॅनेलसाठी काही व्हिडिओ बनवू इच्छितो. जेव्हा सुशांतने यशराजला सोडले तेव्हा त्यानी एका चांगल्या चित्रपटात काम करण्याची इच्छा माझ्या समोर व्यक्त केली होती. पण असा कोणताही चित्रपट होऊ शकला नाही. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये मी पुन्हा रियामार्फत सुशांतशी बोललो. सुशांतने फोन करुन मला सांगितलं की, मला तुमच्याशी बोलायला आवडत. मला तुला भेटायचं आहे. सुशांतला त्यावेळी बर वाटत नव्हतं म्हणून मी त्याला भेटायला त्याच्या वांद्रे येथील घरी गेलो होतो. त्या भेटीत आम्ही माझ्या YouTube व्हिडिओ आणि सुशांतच्या YouTube चॅनेलबद्दल बोललो. मग आमच्या पुस्तकांबद्दल आम्ही चर्चा केली. बरीच चर्चा केल्यानंतर मी निघून परत आपल्या घरी आलो. त्यानंतर मी कधीही सुशांतला भेटलो नाही आणि परत आमच बोलणं ही झालं नाही.
"रिया मला वडिलांप्रमाणे मानते. मी रियाचा गुरु आहे. मी आणि रिया फक्त आणि फक्त कामाबद्दल चर्चा करतो. रिया आणि सुशांतच्या वैयक्तिक विषयांवर मी कधीच चर्चा केली नाही. आमच्यात सुशांतच्या नैराश्याच्या आजाराची फारशी चर्चा कधी झाली नव्हती", असेही ते म्हणाले. सडक-2 या चित्रपटाविषयी महेश भट्ट म्हणाले की, माझी सुशांतची भेट होण्यापूर्वीच सडक-2 ची कास्टिंग पूर्ण झाली होती.
पोलिसांनी महेश भट्ट यांना तपासासाठी का बोलावले?
चौकशीसाठी महेश भट्ट यांना बोलवण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे सुशांतच्या कुटुंबाच्यावतीने सुशांतच्या मृत्यूशी संबंधित रिया कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी होती. पोलिस तपासात काही लोकांच्या जबाब मध्ये हे उघड झाले की, महेश भट्ट हे रिया आणि सुशांतच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करत होते, यामुळे रिया सुशांतपासून दूर गेली.
दुसरीकडे सोशल मीडियामध्ये अशा काही बातमी आल्या ज्यामध्ये असा दावा केला जात होता की, महेश भट्ट यांनी रियाला सुशांतच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सुशांतच्या आयुष्यापासून दूर जाण्यास सांगितले होते. महेश भट्ट यांनी या गोष्टी निराधार असल्याचे सांगितले आहे.
संबंधित बातम्या :