मुंबई : सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येवरून बराच गदारोळ सुरू झाला आहे. कंगना रनोटने तो गेल्यानंतर नेपोटिझम आणि आऊडसायडर्सना मिळणारी ट्रिटमेंट यावर बरंच भाष्य केलं आहे. सुशांत नैराश्यात होता का.. त्याल कोणता आजार होता का.. त्याला कोण सतावत होतं का.. त्याला कुठला दबाव होता का अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती रोज होते आहे. अशात बिहारमध्ये सुशांतच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली ती रिया चक्रवर्ती विरोधात. त्यावर अंकिता लोखंडेने ट्विटकरून आपलं मत मांडलं आहे. या तिच्या ट्विटला बराच अर्थही आहे.


अंकिता लोखंडे आणि सुशांत हे रिलेशनशिपमध्ये होते. जवळपास सहा वर्षं हे नातं जपल्यानंतर सुशांत तिच्यापासून वेगळा झाला. त्याचा त्रास दोघांनाही झाला. पण एकमेकांबद्दल त्यांनी कधीच ब्र काढला नाही. कालांतराने सुशांत सेटल झाला. गेल्या वर्षभरापासून तो रिया चक्रवर्तीसोबत होता. सुशांतच्या आत्महत्येनंतर राजपूत कुटुंबियांनी पहिल्यांदाच एक भूमिका घेऊन पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या एफआयआरमध्ये सुशांतच्या वडिलांनी १० मुद्दे मांडले आहेत. यात सुशांतने कसे १५ कोटी वेगळ्या अकाऊंटवर ट्रान्सफर केले.. रियाने सुशांतकडची रक्कम, दागिने आणि काही कागद घेऊन कसं घर सोडलं.. रिया त्याला कशी धमकावत होती.. सुशांतला कुर्गला सेटल व्हायचं असताना त्याने तिथे जाऊ नये म्हणून तिने त्याच्या आजाराचं कारण देत त्याला कसं ब्लॅकमेल केलं असे अनेक मुद्दे माडले आहेत.

रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार, अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करण्याची शक्यता



ही तक्रार दाखल झाल्यानंतर बिहार पोलिसांचं चार जणांचं पथक मुंबईत दाखल झालं होतं. यामुळे रिया चक्रवर्तीसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. रियाने अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला आहे. आता या तक्रारीमुळे या प्रकरणाला नवं वळणं मिळालं आहे. हे प्रकरण ताजं असतानाच सुशांतची पूर्वश्रमीची प्रेयसी अंकिता लोखंडे हिने ट्रुथ विन्स असं ट्विट करून या तक्रारीला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी आता करण जोहरची चौकशी होणार!

सुशांत आणि अंकिता यांचं नातं लपून राहिलेलं नाही. अर्थात ते वेगळे झाले असले तरी त्यांच्यात मैत्र होतं. सुशांतला रियाकडून होणारा हा त्रास अंकिताला माहीत होता का.. सुशांत तिच्याशी काही बोलला होता का.. सुशांतच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर सत्याचा विजय होतो असं तिला का वाटलं.. सत्य खरंच पूर्ण बाहेर आलं आहे का असे अनेक प्रश्न सिनेवर्तुळाला पडले आहेत. पण तिच्या या ट्विटने रियाविरोधात दाखल झालेली तक्रार हे योग्य पाऊल असल्याचं तिने सूचित केलं आहे.

"मी रियाला कधीही सुशांतपासून दूर होण्यास सांगितले नाही" : महेश भट्ट

अंकिताने आपला टिकटॉक व्हिडिओ १३ जूनला टाकला होता. त्यानंतर १४ जूनची सुशांतची घटना कळल्यानंतर अंकिता ट्विटरवरुन गायब झाली होती. अर्थात सुशांतचं नाव न घेता तिने ट्विटमधून सुशांतसाठी प्रार्थना केलेली कळत होतीच. दिल बेचारा रिलीज झाला तेव्हाही तिने पवित्र रिश्ता ते दिल बेचारा.. असं सांगत ट्विट केलं होतं. या पलिकडे आपली भूमिका तिने या ट्विटमधून पहिल्यांदाच मांडली आहे. अर्थात ट्रुथ विन्स म्हणताना, तिने कसलाही संदर्भ दिलेला नाही.