मुंबई : बिहार पोलिस आता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुशांतची माजी प्रेयसी अंकिता लोखंडेची चौकशी करणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंकितानेच सुशांत आणि रिया यांच्यात सुरू असलेल्या तणावाची माहिती सुशांतच्या कुटुंबीयांना दिली होती. त्यानंतरच सुशांतच्या मृत्यू प्रकरणात रिया कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांकडे केली होती.


सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता सुशांतच्या मुंबईच्या घरी तिच्या कुटुंबियांना भेटायला गेली होती. त्यावेळी अंकिता आणि सुशांतच्या वडिलांमध्ये एक तास चर्चा झाली होती. माहितीनुसार, त्यानंतरच सुशांतच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, रियाच्या भूमिकेची चौकशी झाली पाहिजे. अंकिताही पाटणा येथे गेल्याचे वृत्त आहे. बिहार पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडे दोन वेळा पाटण्याला ही गेली होते. त्याच वेळी अंकिताने सुशांतची बहीण श्वेताशी भेट घेतली. श्वेता आणि अंकिता पूर्वीपासून एकमेकींना ओळखत असल्याने आणि दोघींचे चांगले संबंध आहेत. अंकिताने श्वेताला सुशांत आणि तिच्यामध्ये झालेल्या चॅटिंगची पूर्ण माहिती दिली.

सुशांतच्या बॅंक खात्यातले कोट्यावधी पैसे गेले कुठे?

अंकिता लोखंडेने सुशांतच्या कुटुंबियांना सांगितले आहे की, मणिकर्णिका चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सुशांतने तिला शुभेच्छा देण्यासाठी मेसेज केला होता. त्यानंतर दोघांमध्ये बरीच चर्चा झाली. त्याने अंकिताला सांगितले की, ‘तो रिया सोबत खुश नाही, त्याला रिया सोबत संबंध संपवायचे आहे. कारण रिया चक्रवर्ती त्याला खूप अस्वस्थ करते’ हे चॅट बिहार पोलिसांच्या चौकशीचा प्रमुख आधार आहे. यामुळे गुरुवार बिहार पोलिसही या प्रकरणात अंकिता लोखंडेची चौकशी करणार आहेत.

Sushant Singh Rajput Death Case | रिया चक्रवर्तीची सुप्रीम कोर्टात धाव, सर्वात महागडे वकील लढणार केस

सुशांत प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी अंकिताचा जबाब नोंदवलेला नाही. पण अनौपचारिक संभाषणादरम्यान अंकिताने पोलिसांना सांगितले आहे की, सुशांत हा आपल्या जवळच्या लोकांमुळे नैराश्यत गेला. अंकिता लोखंडेचा हा जबाब पोलिसांनी नोंदवला नाही.

अंकिता लोखंडे म्हणते, विजय सत्याचाच!

जर मी त्याच्या आयुष्यात असते तर तो आज जिवंत असता- अंकिता

2016 मध्ये सुशांतने अचानक मला सोडून गेला. आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, ते अचानक असं संपू शकत नव्हतं, पण तो गेला. मी तिला मुलाप्रमाणे सांभाळायची, पण माझ्यानंतर ज्या कोणाबरोबर ही सुशांत होता. त्यांनी त्याला नीट संभाळलं नाही, त्याला नीट समजून घेतलं नाही आणि म्हणून आज सुशांत आपल्यात नाही. सुशांत स्वःताला व्यक्त करायचा नाही, त्याला समजून घ्यावं लागायचं. मला सोडून गेल्यानंतर त्याने माझ्याशी कधी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. मला खात्री होती की सुशांत आमचे प्रेम समजून परत येईल, पण तसे झाले नाही. तसं का झालं नाही, हे मला आजपर्यंत समजले नाही. 2016  नंतर रिया त्याच्या आयुष्यात आली. मला असे वाटते की ज्यांच्याबरोबर तो राहत होता. त्यांना सुशांतच समजला नाही आणि सुशांत आज हरवला. जर मी त्याच्या आयुष्यात असते तर तो आज जिवंत असता, तो आज आपल्यामध्ये असते.