मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस आता बॉलिवूडमधील निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याची चौकशी करणार आहेत. या आठवड्याच्या अखेरीस करण जोहरचा जबाब नोंदवला जाईल. धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांची मंगळवारी (28 जुलै)चौकशी होणार आहे. पोलिसांनी धर्मा प्रॉडक्शन आणि सुशांत यांच्यातील 'ड्राईव्ह' चित्रपटासंदर्भातील कराराची प्रतही मागितली आहे.


पोलीस तपासात सुशांत आणि धर्मा प्रॉडक्शन यांच्यात 'ड्राईव्ह' चित्रपटावरुन वाद निर्माण झाल्याचे समोर आलं आहे. खुद्द सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदीने पोलीस चौकशीत करण जोहर आणि सुशांत यांच्यातील एका प्रोजेक्टबद्दल महत्त्वाची माहिती दिली. श्रुतीच्या मते, सुशांतने धर्मा प्रॉडक्शनच्या 'ड्राईव्ह' चित्रपटात काम केलं. त्या चित्रपटाच्या डबिंगसाठी सुशांत तारीख देत नव्हता. यावर श्रुती सुशांतशी बोलली, तेव्हा सुशांत म्हणाला की मी तीन वेळा डबिंगसाठी तारीख दिली होती, पण त्याने (करणने) काहीच उत्तर दिलं नाही, आता मी माझा वेळ घेतोय. या चित्रपटासंदर्भात सुशांत आणि करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये काही मतभेद निर्माण झाले होते का याची माहिती मुंबई पोलीस घेत आहेत.


"मी रियाला कधीही सुशांतपासून दूर होण्यास सांगितले नाही" : महेश भट्ट


'साहब को बुरा लगेगा इसलिये?'; कंगनाच्या रडारवर आता आदित्य ठाकरे







याशिवाय सोशल मीडियावर सतत चर्चा सुरु आहे की, धर्मा प्रॉडक्शनने ओटीटीवर हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सुशांत सिंह राजपूत नाराज झाला होता. तसंच हा चित्रपट बनवताना किंवा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी धर्मा प्रॉडक्शनने न कोणताही प्रयत्न केला नाही. मात्र सुशांतला या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या, ज्यामुळे सुशांत नाराज झाला होता.



'ड्राईव्ह' चित्रपटचा करार होण्यापूर्वी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला की नंतर निर्णय बदलण्यात आला हे पोलिसांना जाणून घ्यायचे आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी पोलिसांनी धर्मा प्रॉडक्शन आणि सुशांत यांच्यातील कराराची प्रत मागितली आहे.


Dil Bechara Movie Review | हूरहूर..हळहळ आणि वेदना!


त्याचवेळी कंगना रनौतसारखे सेलिब्रिटी करण जोहरच्या विरोधात उघडपणे बोलत आहेत. काहींचा आरोप आहे की सुशांतविरोधात करणने इंडस्ट्रीतील एक लॉबी, एक ग्रुप बनवला होता. ही लॉबी सुशांतला मानसिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी, त्याच्यावर वेगवेगळे आरोप करुन ते चर्चेचा विषय बनवण्यासाठी ब्लाईंड आर्टिकल लिहित होते. सुशांतविरोधात बॉलिवूडमध्ये काही षडयंत्र रचले गेले होते का हे जाणून घेण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करत आहेत.


संबंधित बातम्या




SSR Suicide Case | सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरची चौकशी होणार



SSR Suicide case | सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये महेश भट्ट यांची जबाब नोंदणी | ABP Majha