मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांविरुद्ध पाटनातील राजीव नगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये रियावर सुशांतला प्रेमात फसवून त्याची कोट्यावाधी रक्कम आपल्या नावावर करण्याचा, त्याला ब्लॅकमेल करण्याचा आणि त्याचा मानसिक छळ करुन आत्महत्येला भाग पाडण्याचा आरोप केला आहे. मुंबई पोलिसांनीही सुशांतच्या बँक खात्याचा तपास केला होता ज्यामध्ये सुशांतचे पैसे रिया वापरत असल्याची माहिती समोर आली होती.


मुंबई पोलिसांच्या तपासा मध्ये काय निष्पन्न झालं होतं?

जानेवारी 2019 मध्ये सुशांतसिंगच्या महिंद्रा कोटक बँकेच्या खात्यात साडे सहा ते सात कोटी रुपये जमा होते. मात्र जेव्हा सुशांत सिंगने आत्महत्या केली, त्यावेळी फक्त अडीच कोटी रुपये शिल्लक होते. एवढी मोठी रक्कम सुशांतनं कुणावर खर्च केली? गर्लफ्रेंड रियानं सुशांतकडून तब्बल 15 कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप राजपूत कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळं सुशांतच्या आत्महत्येचा आर्थिक व्यवहाराशी काही संबंध आहे का? या अनुषंगानं मुंबई पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आहे

सुशांतला रॉयल्टी व मदतकडून पैसे मिळायचे. सुशांतचा सर्व खर्च याच खात्यातून चालायचे. दररोज, वैयक्तिक खर्चासाठी हजारो रुपये कॅश या
खात्यातून काढले जात होते. प्राथमिक चौकशीत असेही दिसून आले आहे की, रियाचा खर्च सुशांतच्या याच खात्यामधून होत होता. रियाचा शॉपिंग आणि स्पा सारख्या गोष्टींचा खरच हा सुशांतच्या या खात्यातून होत असे. थॉमस कुक यांना दिलेल्या 45 लाख रुपयांची तपासणी मुंबई पोलिस करीत आहेत. सुशांतच्या युरोप दौर्‍यासाठी हा पैसा दिला गेला होता. रिया आणि तिचा भाऊ सुशांतबरोबर या युरोप टूरला गेले होते. वांद्रेच्या घरासाठी दरमहा साडेतीन लाख रुपये भाडे या अकाऊंटमधून दिलं जात होतं.

सुशांतवर कोणताही आर्थिक ताण नसल्याचे सुशांतच्या सीएने चौकशी दरम्यान सांगितले की, सुशांतकडे पैसे यायचे आणि ते खर्च ही होत होते. अंधेरी येथील वॉटर स्टोन रिसॉर्टमध्ये रिया आणि सुशांत राहायचे. त्यासाठी सगळा पैसा सुशांतच्या खात्यातून वापरला जात होता. तसच पुण्याजवळील पवना धरणाजवळ सुशांतने भाड्याने व्हिला घेतला होता त्याचे भाडे ही सुशांतच्या खात्यातून जायचे.

संबंधित बातम्या :