मुंबई : सुशांतसिंग राजपूत यांचे वडील केके सिंह यांनी बॉलिवूडच अभिनेत्री आणि सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ताज्या माहितीनुसार, रिया याप्रकरणी सुप्रीम कोर्टात पोहोचली आहे. रियाने स्वतःच्या बचावासाठी देशातील सर्वात मोठ्या वकिलांपैकी एक वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांना हायर केलं आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि संजय दत्त यांच्या केसेस अॅड. सतीश माने शिंदे हाताळल्या आहेत.


अॅड. सतीश मानशिंदे यांनी म्हटलं की, आम्ही सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली आहे. यामध्ये सुशांतसिंह राजपूतच्या केसची चौकशी मुंबईला ट्रान्सफर करण्याची मागणी केली आहे.





रियाच्या कुटुंबावरही गंभीर आरोप


अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वडील के के सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप करत गुन्हा नोंदवला आहे. सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी 25 जुलै रोजी बिहारच्या पाटण्यातील राजीवनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार रिया चक्रवर्तीसह इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरिंडा, श्रुती मोदी आणि इतरांविरोधात फसवूणक, दगाबाजी, ओलीस ठेवणे आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. सुशांतच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, "या कटात रिया आणि तिच्या कुटुंबातील इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती यांनी माझ्या मुलासोबत जवळीक वाढवली होती आणि हे सगळेच माझ्या मुलाच्या प्रत्येक बाबत हस्तक्षेप करायला लागले. तसंच सुशांत ज्या घरात राहत होता तिथे भूत-प्रेत असल्याचं सागंत त्याला ते सोडायला लावलं."


संबंधित बातम्या