Suraiya Birth Anniversary : बॉलिवूड अभिनेत्याच्या प्रेमात सुरैया आजन्म राहिल्या अविवाहित! वाचा अभिनेत्री सुरैयांबद्दल...
Suraiya Birth Anniversary : सुरैया एक चांगल्या अभिनेत्री तर होत्याच, पण त्या एक उत्तम गायिका देखील होत्या.
Suraiya Birth Anniversary : हिंदी सिनेजगतात अनेक कलाकार आले आणि गेले, पण यात असे काही कलाकार होते जे कायम प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान मिळवून राहिले. अशाच कलाकारांपैकी एक नाव होती अभिनेत्री सुरैया यांचे! व्यावसायिक जीवनात खूप यशस्वी ठरलेल्या या अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्य मात्र खूप वेदनादायी होते. अभिनेत्री सुरैया, अभिनेता देव आनंद यांच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यांच्या प्रेमासाठी त्या शेवटच्या श्वासापर्यंत लढल्या. मात्र, त्यांचे हे प्रेम कधीच पूर्णत्वाला गेले नाही.
15 जून 1929 रोजी पंजाबमधील एका मुस्लिम कुटुंबात सुरैया यांचा जन्म झाला होता. सुरैया एक चांगल्या अभिनेत्री तर होत्याच, पण त्या एक उत्तम गायिका देखील होत्या. सुरैया जमाल शेख यांनी अनेक चित्रपट आणि गाण्यांना आपला आवाज दिला आहे. त्या काळात सुरैया यांच्या सौंदर्यावर बरीच चर्चा झाली होती. मरीन ड्राईव्हवर असलेल्या ‘कृष्ण महल’बाहेर नेहमीच त्यांच्या चाहत्यांची गर्दी असायची. चाहत्यांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही वेळा पोलिसांना पाचारण करावे लागायचे. त्यांनी मात्र, देव आनंद यांना आपलं हृदय देऊ केलं होतं. पण हे प्रेम एकतर्फी नव्हते. अभिनेते देव आनंदही त्यांच्या प्रेमात पडले होते. दोघांमध्ये अपार प्रेम होते.
देव आनंदही पडले प्रेमात!
दिग्गज अभिनेते देव आनंद यांनी जवळपास 6 दशके आपल्या कला आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. अभिनेते देव आनंद यांच्यासारखा डायलॉग डिलिव्हरी करणारा कलाकार आजवर झाला नाही, असे म्हटले जाते. देव आनंद यांच्या अभिनयाने त्यावेळी चाहत्यांच्या मनावर वेगळीच छाप सोडली होती.
देव आनंद हे अभिनेत्री सुरैयाच्या प्रेमात पडू लागले होते, पण त्यांचे नाते काही पुढे जाऊ शकले नाही. सुरैया आणि देव आनंद यांच्या या अधुऱ्या प्रेमकहाणी मागे अनेक कारणे सांगितली जात होती. एकदा असाही प्रसंग घडला होता की, देव आनंद अंगठी घेऊन सुरैयाला भेटायला आले होते, मात्र अभिनेत्रीने रागाच्या भरात ती अंगठी समुद्रात फेकून दिली होती.
मनात प्रेम होते कायम!
अभिनेते देव आनंद हे एकदा गुपचूप सुरैया यांना भेटायला गेले होते. त्यानंतर सुरैया यांना त्यांनी त्यांच्या मनातील गोष्टी सांगितल्या. प्रेमात आकंठ बुडालेले देव आनंद अंगठी घेऊन सुरैया यांच्याकडे पोहोचले होते. मात्र, रागात असलेल्या सुरैया यांनी त्यांची अंगठी समुद्रात फेकून दिली होती. याविषयी बोलताना देव आनंद म्हणाले होते की, तिने असे का केले हे त्याक्षणी मला देखील कळले नाही, रिपोर्ट्सनुसार, सुरैया आणि देव यांची जोडी अभिनेत्रीच्या आईला पसंत नव्हती. अभिनेत्रीने हिंदू मुलाशी लग्न करू नये, असे सुरैया यांच्या कुटुंबीयांना वाटत होते. त्यामुळे दोघांच्या प्रेमामध्ये भिंत उभी राहिली आणि ते वेगळे झाले. मात्र, असे असतानाही सुरैया यांनी नेहमीच देव आनंद यांच्यावर प्रेम केले आणि त्या आजन्म अविवाहित राहिल्या.
हेही वाचा :
Ananya : देव कधीही चुकत नसतो, तो जादू करतो...बहुचर्चित 'अनन्या'चा टीझर प्रदर्शित
Zol Zaal : 'झोलझाल' सिनेमातील वैशाली सामंतने गायलेलं 'झोलझाल' गाणं प्रेक्षकांसाठी ठरणार पर्वणी