Sunny Marathi Movie: 'मराठी पाऊल पडते कुठे?'; 'सनी' चित्रपटाचे शो रद्द झाल्यानं चिन्मय आणि ललितचा संताप
'सनी' (Sunny) या चित्रपटातील कलाकार चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) आणि ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सनी चित्रपटाचे शो रद्द झाल्यानं संताप व्यक्त केला.
Sunny Marathi Movie: 'सनी' (Sunny) हा मराठी चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाचं दिग्दर्शन हेमंत ढोमे (Hemant Dhome) यानं केलं आहे. हेमंतनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. हेमंत ढोमेने प्रेक्षकांच्या तिकिटाचे पैसे परत केल्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत ट्वीट केलं. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी. या राज्यात मराठी सिनेमासाठी जर आता एक शो मिळवायला झगडावं लागत असेल तर कठीण आहे. शुक्रवारी लागलेला सिनेमा दुसऱ्या दिवशी निघतोय. लोक 'सनी' या सिनेमाची तिकीटं काढत आहेत. पण शोज कॅन्सल केले जात आहेत". आता या चित्रपटातील कलाकार चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) आणि ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सनी चित्रपटाचे शो रद्द झाल्यानं संताप व्यक्त केला आहे.
चिन्मय मांडलेकर
चिन्मयनं सोशल मीडियावर काही बातम्यांचे स्क्रिनशॉर्ट शेअर केले आहेत. या पोस्टला चिन्मयनं कॅप्शन दिलं, 'इतके दिवस ते म्हणत होते कि लोकंच येत नाहीत. आता बुकिंग केलेल्या प्रेक्षकांना मेसेज जातायत की तुमचं बुकिंग कॅन्सल पैसे परत घ्या. बनवणाऱ्यांनी चित्रपट बनवला, ज्यांनी पाहिला त्यांना आवडला ही आहे, आणखी लोकांना पाहायचा आहे. मग ही मधली लोकं कोण. काही दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मराठी चित्रपट सृष्टीतल्या निर्मात्यांची आवर्जून भेट घेतली होती. आता पुन्हा त्यांच्याचकडे हे गाऱ्हाणं मांडावं का?'
View this post on Instagram
ललित प्रभाकर
ललित प्रभाकरनं देखील पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, 'मराठी पाऊल पडते कुठे?'
View this post on Instagram
सनी हा चित्रपट 18 नोव्हेंबरला रिलीज झाला. या चित्रपटाच्या कथानकराचे आणि कलाकारांच्या अभिनयाचं अनेक लोक कौतुक करत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Hemant Dhome : 'माझ्या एका चुकीने माझाच गेम झाला'; पत्नी क्षितीसमोर हेमंतनं सांगितली आठवण