![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sunny Leone : सनी लिओनीचं नवं गाणं 'Third Party' आऊट! IAS अभिषेक सिंहसोबत थिरकली
Sunny Leone : सनी लिओनीचं 'थर्ड पार्टी' हे नवं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
![Sunny Leone : सनी लिओनीचं नवं गाणं 'Third Party' आऊट! IAS अभिषेक सिंहसोबत थिरकली Sunny Leone Third Party Sunny Leone IAS Abhishek Singh on Third Party Song Out Bollywood Entertainment Latest Update Actress Dancer Sunny Leone : सनी लिओनीचं नवं गाणं 'Third Party' आऊट! IAS अभिषेक सिंहसोबत थिरकली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/16/d41fe267a86491b15ba17fbea153d0dc1700122717156254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sunny Leone New Song : अभिनयासह आपल्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी सनी लिओनी (Sunny Leone) सध्या चर्चेत आहे. सनीचं 'थर्ड पार्टी' (Third Party) हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अल्पावधीतच या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या गाण्यात सनी लिओनीसह आयएएस (IAS) अभिषेक सिंह थिकरताना दिसत आहे.
सनीचं लिओनीचं नवं गाणं
IAS अभिषेक सिंहने सनी लिओनीसोबत नवं रॅप साँग लॉन्च केलं आहे. 'मेरी पार्टी में कोई थर्ड पार्टी नहीं' असे या गाण्याचे बोल आहेत. अभिषेक सिंहने स्वत: हे गाणं गायलं आहे. टी-सीरिजच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे.
'थर्ड पार्टी' हे गाणं 2 मिनिट 53 सेकंदाचा आहे. या गाण्यात अभिषेक सिंहने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि त्यावर लाल रंगाचं टीशर्ट परिधान केलं आहे. तर दुसरीकडे सनी लिओनीनेदेखील लाल रंगाचा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे.
View this post on Instagram
आयएएस असणारा अभिषेक हा लोकप्रिय अभिनेता असण्यासोबत गायक, गीतकार आणि संगीतकार आहे. अभिषेकची 'दिल्ली क्राइम' ही वेबसीरिज चांगलीच गाजली होती. या सीरिजमधील त्याच्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं. त्यानंतर त्याने 'याद आती है' आणि 'काली काली जुल्फों के' या म्युझिक व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली. अभिषेकला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. पण या क्षेत्रात यश न मिळाल्याने त्याने अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि आयएएस अधिकारी झाला.
आजच्या तरुणांना हे गाणं नक्कीच आवडेल : अभिषेक सिंह
'थर्ड पार्टी' या गाण्याबद्दल बोलताना अभिषेक म्हणाला,"थर्ड पार्टी' हे गाणं मी लिहिलं आणि गायलं आहे. माझे मित्र प्रत्येकदा मला म्हणायचे मी आपण एकसाथ पार्टी करू. ती आपली एक्सक्लूझिव्ह पार्टी असेल आणि या पार्टीत कोणतीही थर्ड पार्टी सहभागी होणार नाही. आजच्या तरुणांना हे गाणं नक्कीच आवडेल". टीसीरिजच्या बॅनरअंतर्गत 'थर्ड पार्टी' या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.
सनी लिओनी म्हणाली,"एका आयएएस अधिकाऱ्यासोबत मी थिरकत आहे या गोष्टीचा मला फरक पडत नाही. अभिषेक हा एक उत्तम कलाकार आहे. त्याच्यासोबत काम करताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या". सनी लिओनीचं 'थर्ड पार्टी' हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.
संंबंधित बातम्या
Food Items Named After Celebrities: सनी लियोनी चाप अन् चिकन संजू बाबा; हॉटेलमधील चविष्ट पदार्थांना बॉलिवूड कलाकारांची नावं!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)