एक्स्प्लोर

sunny leone : 'आमदार निवास'मध्ये सनी लिओनी!, शांताबाई  गाण्यावर थिरकणार

sunny leone Latest Marathi songs : महाराष्ट्राच्या "आमदार निवास" मध्ये सनी लियोनी दिसणार आहे. "शांताबाई'' या मराठी लोकप्रिय गाण्यावर थिरकणार सनी लिओनी

sunny leone Latest Marathi songs :  सनी लिओनी आमदार निवासात! चक्रावलात ना? पण ही बातमी अगदी खरी आहे. सनी लिओनी आमदार निवास या मराठी चित्रपाट गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. आमदार निवास या चित्रपटातील शांताबाई या गाण्यावर सनी लिओनी थिरकताना दिसणार आहे. काही वर्षांपूर्वी सनी लिओनी आमदार निवासात दिसली होती, त्यावेळी चर्चेला उधाण आले होते.

अभिनेत्री सनी लियोनीने बॉलीवूड मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. आता सनी लिओनीने प्रादेशिक सिनेमाकडे आपला मोर्चा वळवला आहे. तेलगू ,तामिळ, मल्याळम आणि कन्नड दर्शकांना उत्कृष्ट अदा दाखवल्यांनतर सनी मराठीमध्ये गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. आमदार निवास या चित्रपाटात आयटॉम साँग करताना सनी लिओनी दिसणार आहे. दरम्यान,  यापूर्वी सनीने बॉईज या मराठी चित्रपटाच्या 'कुठं कुठं जायच हनिमूनला' या गाण्यावर थिरकून मराठी प्रेक्षकांची मन जिंकली होती.

लवकरच सनी लियोनी संजीव कुमार राठोड निर्मित व दिग्दर्शित मराठी चित्रपट आमदार निवासामध्ये 'शांताबाई' या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. आगामी आमदार निवास या चित्रपटाच्या निमित्ताने सनी आपल्याला आधुनिक शांताबाई रूपाने भेटणार आहे. या मराठी आयटम साँगची बॉलीवुडने सुद्धा दखल घेतली असून या गाण्याची चर्चा बॉलीवूडमध्ये जोरदार सुरु आहे.  आधुनिक 'शांताबाई'चा अवतार पाहायला सगळेच  उत्सुक आहेत.

2015 मध्ये शांताबाई या गाण्याने महाराष्ट्रात धुमाकुळ  घातला  होता. आतापर्यंत युट्युबवर या गाण्याला 85 कोटीहुन जास्त व्हीज मिळाले आहेत. या गाण्याचे मालकी हक्क सुमीत म्युझिकच्या मालकीचे होते. हे हक्क आता जय जगदंब प्रोडक्शनने घेतले असून महाराष्ट्राची आधुनिक 'शांताबाई' म्हणून सनी लियोनी दिसणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर विष्णू देवा याने या आयटम साँगचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. तर संजय लोंढे यांचं मूळ गीत असलेलं हे गाणं नितीन सावंत यांनी पुर्ननिर्मित करून या गाण्याला आधुनिकतेची झालर घातली आहे. 'शांताबाई' या गाण्याची भव्यता आणि गावरान बाज असलेल्या 'सनी लिओनी'ची दिलखेच अदांनी प्रेक्षकांचा काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान, 'आमदार निवास'  हा चित्रपट सत्य घटनेवर प्रेरित असून सामाजिक दृष्टया दुर्लक्षित अशा विषयावर भाष्य करतो. सामाजिक आणि राजकीय गोष्ट सांगणारा चित्रपट आमदार निवास लवकरच चित्रपट गृहात प्रेक्षकांच्या मनोरंजनास सज्ज होणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Crime : कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
Nashik : 'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 19 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव :19 मे 2024TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 19 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime : कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
Nashik : 'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
'पुरातत्व'च्या तेजस गर्गेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, दीड लाखांच्या लाचेत होता हिस्सा
Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
Rohit Pawar: ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
Weather Update : सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
हवामान अपडेट: सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
Pune Khed Gas Cylinder Blast : गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
Embed widget