एक्स्प्लोर

Sunny Deol : सनी देओलविरोधात फसवणूक आणि खंडणीचा गंभीर आरोप, निर्मात्याने दाखल केली तक्रार

Sunny Deol Accused of Cheating and Extortion : चित्रपट निर्माता सौरव गुप्ता याने सनी देओल विरोधात फसवणूक, खंडणी वसुलीची तक्रार दाखल केली आहे.

Sunny Deol Accused of Cheating and Extortion :  बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. फसवणूक आणि खंडणी वसुलीचा आरोप सनी देओलवर करण्यात आला आहे. चित्रपट निर्माता सौरव गुप्ता याने सनी देओल विरोधात फसवणूक, खंडणी वसुलीची तक्रार दाखल केली आहे.  चित्रपट निर्माते झालेले रिअल इस्टेट डेव्हलपर असलेले सौरभ गुप्ता यांनी हे आरोप केले आहेत.  सनी देओल यांनी चित्रपटात काम करायचे आहे म्हणून पैसे घेतले पण चित्रपट केला नसल्याचे त्यांनी सांगितले. 

सौरव गुप्ता यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, 2016 मध्ये त्यांनी आपल्या चित्रपटासाठी सनी देओलसोबत मुख्य भूमिकेसाठी 4 कोटींची डील केली होती. यातील एक कोटींची रक्कम अॅडव्हान्स दिले होते. मात्र, त्यांनी आमचा चित्रपट पूर्ण करण्याऐवजी पोस्टर बॉईज (2017) या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्याचा पर्याय निवडला. अॅडव्हान्स रक्कम देऊनही सनी देओल माझ्याकडून अधिक पैशांची मागणी करत राहिला. माझे दोन कोटी 55 लाख रुपये सनी देओलच्या खात्यात असल्याचे दावा गुप्ता यांनी केला. सनी देओल यांनी मला दुसऱ्या दिग्दर्शकालाही पैसे देण्यास सांगितले होते असा दावाही त्यांनी केला. 

सनी देओलवर गंभीर आरोप... 

निर्माते सौरव गुप्ता यांनी सांगितले की, सनी देओलने 2023 मध्ये माझ्या कंपनीसोबत एक बनावट करार केला होता. जेव्हा आम्ही हा करार केला तेव्हा त्या करारनाम्यातील मधले पानही बदलण्यात आले होते. त्या 
ठिकाणी चित्रपटात काम करण्याच्या मानधनाची रक्कम 4 कोटींहून 8 कोटी करण्यात आली. तर, नफा दोन कोटी करण्यात आला. 

आणखी एका निर्मात्याने केले आरोप... 

जानवर (1999), अंदाज (2003) या सारख्या चित्रपटाचे निर्माते सुनील दर्शन यांनीदेखील सौरभ गुप्ता यांना पाठिंबा दर्शवला. सुनील दर्शन यांनी सांगितले, मलाही सनी देओलबाबत असाच अनुभव आला. सनी देओलने माझ्या 'अजय' (1996) या चित्रपटाचे परदेशातील वितरणाचे हक्क मिळवले आणि मला अंशत: रक्कम दिली. उर्वरित रक्कम अजूनही दिली नाही. त्यानंतर सनीने माझ्यासोबत एका प्रोजेक्टवर काम करण्याची विनंती केली आणि म्हटले की, ''माझ्यावर विश्वास ठेव, माझी मदत कर.'' असे सांगून सनी देओलने पुन्हा माझ्याकडून पैसे मागितले.

सनी देओलविरोधात तक्रार दाखल... 

सौरव गुप्ता यांनी सांगितले की,  सनी देओलविरोधात मी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी 30 एप्रिल रोजी सनी देओलला एक नोटीस जारी केली होती. त्याच्या ऑफिसच्या पत्त्यावर एक पत्रही पाठवण्यात आले. ज्या दिवशी त्यांना हजर राहण्यास सांगितले, त्या दिवशी सनी बाहेरगावी होते. दरम्यान, या प्रकरणावर सनी देओलकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. 

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
Amruta Khanvilkar Legal Warning On Divorce Rumors: घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
घटस्फोटाच्या अफवा पसरवणाऱ्यांविरोधात अमृता खानविलकर संतापली, उचलली कठोर पावलं; नवऱ्यासोबत संयुक्त पोस्ट करत म्हणाली...
Sonu Nigam Sings Mohammed Rafi Song In Operating Theatre: सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO
सर्जरी सुरू असताना सोनू निगम चक्क गाऊ लागले, ऑपरेशन थिएटरमध्ये रंगली रफी साहेबांच्या गाण्याची मैफिल, VIDEO

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
Embed widget