Sukesh Chandrasekhar Case : सुकेश चंद्रशेखरचं 'बेबी गर्ल' जॅकलिन फर्नांडिसला आणखी एक प्रेम पत्र; वाढदिवसाला देणार मोठं सरप्राईज
Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) आणखी एक प्रेम पत्र लिहिलं आहे.
Sukesh Chandrasekhar On Jacqueline Fernandez : 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे दिल्ली तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने (Sukesh Chandrasekhar) 'बेबी गर्ल' जॅकलिन फर्नांडिसला (Jacqueline Fernandez) आणखी एक प्रेमपत्र लिहिलं आहे. पत्रात जॅकलिनच्या वाढदिवसानिमित्त एक मोठे सरप्राईज प्लॅन केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. 11 ऑगस्टला जॅकलिनचा वाढदिवस आहे.
सुकेशने जॅकलिनला लिहिलेल्या पत्रात काय आहे? (Sukesh Chandrasekhar Letter)
मीडिया रिपोर्टनुसार, मी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे दिल्ली तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने त्याचे वकील अनंत मलिक यांच्यामार्फत जॅकलिनला नवं प्रेम पत्र लिहिलं आहे. अभिनेत्रीला त्याले भलं मोठं पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्याने लिहिलं आहे की,"माझी प्रिय, माझी बेबी गर्ल जॅकलीन... नुकत्याच झालेल्या पुरस्कार सोहळ्यात मी तुझा परफॉर्मन्स पाहिला. हा खूपच अप्रतिम परफॉर्मन्स होता. त्या तुझ्या सादरीकरणानंतर मी तुझ्या पुन्हा एकदा प्रेमात पडलो आहे".
सुकेशने पुढे लिहिलं आहे,"मी खूप भाग्यवान आहे की तू माझ्या आयुष्यात आहेस. त्यामुळेच तुझा वाढदिवस खास करण्यासाठी मी खास नियोजन केलं आहे. मी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो आणि मला माहिती आहे की, तुझंदेखील माझ्यावर खूप प्रेम आहे. लवकरच लोकांसमोर सत्य येईल. काळजी करू नको". अशाप्रकारे सुकेशने पत्राच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सुकेश चंद्रशेखरने याआधीदेखील जॅकलिनला प्रेम पत्र पाठवलं होतं. या पत्रात त्याने लिहिलं होतं की,"जॅकलिनकडे मी प्रेम व्यक्त केलं होतं. तसेच तिला आणि तिच्या कुटुंबियांना मी भेटवस्तूदेखील दिल्या होत्या. आता यासगळ्यात तिचा काय दोष? तिच्याकडूनदेखील प्रेम मिळावं एवढीच माझी अपेक्षा होती. तिच्यावर खर्च करण्यात आलेले पैसे मी कायदेशीर मार्गाने कमावले आहेत. लवकरच हे सिद्ध होईल".
सुकेश चंद्रशेखर प्रकरण काय आहे? (Sukesh Chandrasekhar Case)
200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि नोरा फतेहीची (Nora Fatehi) ईडीकडून चौकशी सुरू आहे. सुकेशने जॅकलिनला 5 जनावरं भेट म्हणून दिली होती. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख होती. तसेच 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही यात समावेश होता. सुकेश आणि जॅकलिनचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली होती.
संबंधित बातम्या