एक्स्प्लोर
Advertisement
प्रदर्शनापूर्वीच 'सुई धागा' दोनवेळा पाहिला, विराट कोहली भारावला!
सुई धागा हा सिनेमा आज प्रदर्शित होत आहे. विराट कोहलीने हा सिनेमा दोन वेळा पाहिल्यचं ट्विट सकाळी केलं.
मुंबई: वरुण धवन आणि अनुष्का शर्मा यांचा बहुचर्चित सुई धागा हा सिनेमा आज प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनापूर्वी या सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग मुंबईतील यशराज स्टुडिओत करण्यात आलं होतं. स्पेशल स्क्रीनिंगला पत्नी अनुष्कासोबत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीही उपस्थित होता. महत्त्वाचं म्हणजे हा सिनेमा पाहून विराट कोहली खूपच भारावला आहे. विराट कोहलीने हा सिनेमा दोन वेळा पाहिल्यचं ट्विट सकाळी केलं.
विराटने वरुण आणि अनुष्काचं खास कौतुक केलं. तसंच सिनेमा जबरदस्त असल्याचं म्हटलं आहे. ट्विटमध्ये विराट म्हणतो, “काल रात्री दुसऱ्यांदा सुई धागा सिनेमा पाहिला. तो पहिल्यापेक्षा आणखी जास्त आवडला. या सिनेमात भावनांनी भरलेले सर्वोत्तम अभिनय सर्व टीमने केले आहेत. मौजी म्हणजेच वरुण धवन जबरदस्त आहे. पण ममताच्या (अनुष्का शर्मा) पात्राने मन जिंकलं. तिची क्षमता खूपच सक्षम आणि परिणामकारक असल्यामुळे ती प्रेमात पडण्यास भाग पडते. सो प्राऊड माय लव्ह. सुई धागा चुकवू नका”
Saw @SuiDhaagaFilm for the second time last night and I loved it more than the first time. What an emotional rollercoaster with brilliant performances by the entire cast. (1) #SuiDhaagaMadeInIndia
— Virat Kohli (@imVkohli) September 28, 2018
दरम्यान, स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान विराट आणि अनुष्काचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्याला खूपच लाईक्स मिळत आहेत. सुई धागाच्या स्पेशल स्क्रीनिंगला विराट-अनुष्कासह भारताचा माजी मध्यमगती गोलंदाज झहीर खान पत्नी सागरिका घाटगेसोबत आला होता. महत्त्वाचं म्हणजे झहीर खाननेही ट्विटरवर आपला सुई-धागाचा रिव्ह्यू जाहीर केला. 'सुई धागा हा सिनेमा पाहायलाच हवा. अनुष्का शर्मा, वरुण धवन आणि सर्व टीमचं अभिनंदन. ममता आणि मौजी उत्तम' असं झहीरने म्हटलं आहे.(2) Mauji was superb @Varun_dvn. But Mamta's character stole my heart totally. Her ability to be so quiet yet so powerful and impactful makes you fall in love with her. SO PROUD my love ❤???? @AnushkaSharma . Don't miss it guys! #SuiDhaagaMadeInIndia
— Virat Kohli (@imVkohli) September 28, 2018
विराट आणि झहीरने सोशल मीडियाद्वारे सुई धागाचा आपला आपला रिव्ह्यू सांगितला. आता प्रेक्षकांना तो सिनेमा भावतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.#suidhaaga is a must watch . A big congratulations to @anushkasharma @varun_dvn and the entire team . Mamta and Mauji #sabbadhiyahai ???? https://t.co/28IGPKmENt
— zaheer khan (@ImZaheer) September 27, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ठाणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement