Subodh Bhave : 'कट्यार काळजात घुसली' सिनेमाला सात वर्ष पूर्ण; सुबोध भावेने केली नव्या सांगीतिक सिनेमाची घोषणा
Subodh Bhave : 'कट्यार काळजात घुसली' या सिनेमाला सात वर्ष पूर्ण झाल्याने सुबोध भावेने नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.

Subodh Bhave On Katyar Kaljat Ghusali : 'कट्यार काळजात घुसली' (Katyar Kaljat Ghusali) हा सिनेमा 12 नोव्हेंबर 2015 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला असला तरी आजही या सिनेमाचं गारूड प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. या सिनेमाला सात वर्ष पूर्ण झाल्याने सुबोध भावेने (Subodh Bhave) नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.
'कट्यार काळजात घुसली' या सिनेमाला सात वर्ष पूर्ण झाल्याने सुबोध भावेने एक खास पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"कट्यार काळजात घुसली'... 12 नोव्हेंबर 2015... एका संगीतमय आनंददायी प्रवासाचे सातवे वर्ष... संगीत माणसं जोडतं आणि आनंद निर्माण करतं... अजून एक आनंददायी संगीतमय प्रवास पुढील वर्षी.. तुम्हा सगळ्यांना मनापासून धन्यावाद."
View this post on Instagram
सुबोधच्या सिनेमाची चाहते नेहमीच प्रतीक्षा करत असतात. त्याच्या 'कट्यार काळजात घुसली' या सिनेमाने तर प्रेक्षकांना वेड लावले आहे. या सिनेमाला सात वर्ष पूर्ण होताच सिनेमाने सुबोध भावेने मोठी घोषणा केली आहे. सुबोध लवकरच सांगीतिक सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'कट्यार काळजात घुसली' नंतर सुबोध कोणता नवा सिनेमा घेऊन येणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. एखादं अजरामर नाटक चित्रपट रूपात सुबोध घेऊन येणार का? या सिनेमात कोणते कलाकार असतील याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
'कट्यार काळजात घुसली' या सिनेमामुळे तरुणांना नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीताची गोडी लागली आहे. सात वर्षानंतर आजही हा सिनेमा तितक्याच आवडीने पाहिला जातो. या सिनेमाच्या माध्यमातून सुबोध भावेने पहिल्यांदा दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. स्वतः काम करत असलेल्या 'कट्यार काळजात घुसली' या नाटकाचा सिनेमा बनावा अशी सुबोधची इच्छा होती.
संबंधित बातम्या
Happy Birthday Subodh Bhave : कधी लाल्याच्या भूमिकेत 'एकदम कडक' एन्ट्री तर कधी 'बालगंधर्व'; सुबोधचा विक्रांत सरंजामे आजही प्रेक्षकांना घालतो भुरळ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
