IPL 2024
क्रिकेट
निवडणूक
अयोध्या राम मंदिर
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्रीडा
फोटो
राशीभविष्य
वेब स्टोरी
वर वधू
इतर
By: नामदेव जगताप | Updated at : 28 Aug 2024 04:37 PM (IST)
Stree 2 Rajkummar Rao Uncut Scene ( Image Source : Other )
Stree 2 Movie : 'स्त्री 2' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. अभिनेता राजकुमार राव, श्रद्धा कपूर आणि पंकज त्रिपाठी यांच्यासह इतर स्टार्सची भूमिका असलेल्या या चित्रपटाने चाहत्यांची मनं जिंकली आहे. दरम्यान, स्त्री 2 या चित्रपटातील एक सीन फायनल कटमध्ये काढून टाकण्यात आला होता. आता राजकुमार रावने या सीनची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या सीनमधील राजकुमारचा फोटो पाहून चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली असून त्यांना हा सीन रिलीज करण्याची मागणी केली आहे.
स्त्री 2 चित्रपटातील (Stree 2 Movie) अभिनेता राजकुमार रावचा (Rajkumar Rao) एक सीन दाखवण्यात आलेला नाही, त्याचा सीन कट करण्यात आला आहे. आता राजकुमार रावने सोशल मीडियावर या सीनची एक झलक शेअर केली आहे. या सीनमधील एक फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना विचारलं आहे की, त्यांना हा सीन पाहण्याची इच्छा आहे का? दरम्यान, या सीनमधील राजकुमार रावचा गेटअप पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. राजकुमार रावचा आगळावेगळा लूक पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
राजकुमार रावने मंगळवारी इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये, तो एका मुलीच्या लूकमध्ये दिसत आहे. राजकुमारने मुलीचे कपडे आणि विग घातलेला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. मिनी स्कर्ट आणि चमकदार लाल टॉप घातलेला राजकुमारचा फोटो पाहून तुम्हीही क्षणभर थक्क व्हाल. दुसऱ्या फोटोमध्ये तो दिग्दर्शक अमर कौशिकसोबत त्याच पोज देताना दिसत आहे.
फोटो शेअर करताना राजकुमार रावने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'स्त्री 2' चित्रपटातील माझा सर्वात आवडता आणि मजेदार सीन, जो फायनल कटमध्ये आला नाही. तुम्हाला चित्रपटातील हा सीन बघायचा आहे का? तुम्ही सांगा.' यासोबतच त्यांनी अमर कौशिक यांनाही पोस्टमध्ये टॅग केलं आहे. राजकुमार रावने हा फोटो शेअर करताच त्याच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला असून आणि कमेंट्सचा पूर आला आहे.
राजकुमार रावची 'स्त्री 2' को-स्टार श्रद्धा कपूरने लिहिले, 'होय! विकी प्लीज टाकून घे. अभिनेता विजय वर्माने लिहिलं आहे, 'हाहाहा, मी हे पाहण्यासाठी पैसे देईन.' चित्रपट निर्माते गुनीत मोंगाने लिहिलंय, 'होय, मी सीन पाहण्यासाठी पैसे देईन.' भूमी राजगोरने प्रतिक्रिया देत लिहिलंय, 'जेव्हा या सीनचं शूटींग सुरु होतं, तेव्हा मी हे पाहिलं आहे. तो माझा आवडता सीन होता. हिल तुटणे आणि विग फाईट'. आता चाहत्यांनाही हा सीन पाहण्याची उत्सुकता लागली असून ओटीटीवर हा सीन रिलीज करणय्याची मागणी केली आहे.
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या खरंच अंगात आलं होतं? 'माता की चौकी' कार्यक्रमात नेमकं काय घडलं? अखेर सत्य समोर
'बॉर्डर 2 'मधून लक्ष वेधणारी अभिनेत्री कोण? वरुण धवनसोबत साकारणार प्रमुख भूमिका; वडील अन् आजोबाही होते सैन्यात
विलासरावाचं नाव घेऊन रवींद्र चव्हाणांची टीका; अमित देशमुखांचा संताप, रितेश अन् धीरजकडूनही पलटवार
धुरंधरची क्रेझ कमी झाली? 32 व्या दिवशी किती कोटींची कमाई केली?
घटस्फोटानंतर माही विजची पहिली पोस्ट व्हायरल, एक्स हसबंडसोबतचा फोटो अन् कॅप्शननं वेधलं लक्ष
मोठी बातमी : शिंदेसेनेला बाजूला ठेवून भाजपची काँग्रेससोबत युती, मुंबईच्या वेशीवर देशातील सर्वात मोठी राजकीय घडामोड
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमध्ये तेजी सुरुच,बाजारमूल्य 10 लाख कोटींजवळ, 1100 चा टप्पा ओलांडणार?
मनसेला आणखी एक धक्का, दोघांचा शिवसेनेत प्रवेश; माजी आमदारानेही भाजप सोडली, शिंदेंच्या उपस्थितीत भगवा हाती
reliance share : रिलायन्सच्या शेअरनं काल उच्चांक गाठला अन् आज मोठी घसरण, 8 महिन्यांच्या निचांकी पातळीवर, एका दिवसात काय घडलं?