एक्स्प्लोर

Spruha Joshi: "तो माझा सासरा, पण..."; स्पहानं प्रथमेश लघाटे आणि तिच्या नात्याबाबत दिली माहिती

Spruha Joshi: एका मुलाखतीमध्ये स्पृहानं प्रथमेश लघाटे आणि तिच्या नात्याबाबत माहिती दिली आहे.

Spruha Joshi: अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) ही तिच्या मालिका आणि चित्रपटांमुळे चर्चेत असते. स्पृहा तिच्या अभिनयांनी प्रेक्षकांची मनं जिंकत असते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये स्पृहानं तिच्या आणिवरद लघाटेच्या लव्ह स्टोरीबाबत सांगितलं.  

 सुलेखा तळवलकर यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पृहानं सांगितलं, "वरद आणि मी कॉलेजमध्ये असताना एका अॅक्टिव्हिटीसाठी एका टीममध्ये काम केलं. वरद तिथे माझा सिनियर होता. 2014 मध्ये आम्ही लग्न केलं. वरदला अॅक्टिंग करणारी मुलगी नको होती. तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की, मला अभिनयात करिअर करायचं नव्हतं. त्यामुळे आम्ही डेट करायचा निर्णय घेतला. पण नंतर मी त्याला माझा निर्णय सांगितला की, मला अभिनयातच करिअर करायचं आहे. जेव्हा अग्निहोत्रचं शूटिंग सुरु होतं, तेव्हा तो मला भेटायला पुण्याला आला होता. मला भेटायला त्यानं अनेकदा ऑफिसमधून सुट्टी घेतली होती."

काही दिवसांपूर्वी प्रथमेश लघाटे आणि  मुग्धा वैशंपायन हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. याबाबत प्रथमेश आणि मुग्धा यांनी पोस्ट शेअर करुन चाहत्यांना माहिती दिली होती.  प्रथमेश आणि मुग्धा यांच्या पोस्टवर स्पृहानं कमेंट केली होती,"व्हा बुवा... वहिनी तुमचं स्वागत आहे" तिच्या या कमेंटवर अवधूत गुप्तेने लिहिलं होतं,"जीजूंचं स्वागत नाही करणार का?" त्यावर कमेंट करत स्पृहाने लिहिलं होतं,"अहो सर... ते आधीच सासरे आहेत माझे". तर यावर प्रथमेशने कमेंट करत लिहिलं आहे,"सासरा आहे मी तिचा". तर मुग्धाने लिहिलं आहे,"मी सासू... नो...". स्पृहाच्या कमेंटनंतर सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली की, मुग्धा ही स्पृहाची सासूबाई होणार आहे.

प्रथमेश लघाटेसोबतच्या नात्याबाबत स्पृहानं मुलाखतीमध्ये सांगितलं, "प्रथमेश लघाटे हा वरदच्या नातेवाईकांपैकी एक आहे. प्रथमेश नात्यानं माझा सासरा आहे. पण तो मला धाकट्या भावासारखा आहे. जेव्हा प्रथमेश आणि मुग्धा यांचे ठरले तेव्हा सोशल मीडियावर अशी चर्चा झाली की, मुग्धा स्पृहाची सासूबाई होणार."

स्पृहा ही  काही दिवसांपूर्वी  ‘लोकमान्य’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. नेव्हर माईंड,पेईंग घोस्ट,बायोस्कोप,लहानपण देगा देवा,नांदी,समुद्र या नाटकांमध्ये स्पृहानं काम केलं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Spruha Joshi: स्पृहा सहा वर्षाची असताना तिच्या आई-बाबांनी दिलं होतं 'हे' खास गिफ्ट; अभिनेत्रीनं सांगितला किस्सा

महत्त्वाच्या बातम्या

Rajpal Yadav Supreme Court Hearing: 'मी स्वतःच एक तमाशा बनलोय...'; राजपाल यादवचा कोर्टातच इमोशनल ड्रामा, चेक बाउन्स प्रकरणात अडचणी वाढणार?
'मी स्वतःच एक तमाशा बनलोय...'; राजपाल यादवचा कोर्टातच इमोशनल ड्रामा, चेक बाउन्स प्रकरणात अडचणी वाढणार?
Thalapathy Vijay Son Jason Sanjay: ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
Netflix Web Series Love: डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल
डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल
Janak Upcoming Movie: तो एक क्षण… ती एक घटना… आणि आयुष्यभरासाठी बदललेलं सत्य! सायली संजीवच्या दमदार मराठी सिनेमाचं मोशन पोस्टर प्रदर्शित, पाहिलंत?
तो एक क्षण… ती एक घटना… आणि आयुष्यभरासाठी बदललेलं सत्य! सायली संजीवच्या दमदार मराठी सिनेमाचं मोशन पोस्टर प्रदर्शित, पाहिलंत?

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget